महाराष्ट्रराजकीय

नांदगावकरांचा पुन्हा सुहास आण्णा कांदेंवर विश्वास ,विक्रमी ९० हजार ९० मतांचे मताधिक्य घेत दणदणीत विजय…

भयमुक्तीचा निष्प्रभ नारा; विकासाचाच विजय खरा !

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.२४ अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या नांदगाव मतदारसंघात शिवसेना,भाजप महायुतीचे उमेदवार सुहास आण्णा कांदे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीत चार हजारहून मताधिक्य घेत सुरु केलेली आपल्या विजयाची घौडदौड पंचविसाव्या फेरीअखेर कायम राखत प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांचा नव्वद हजार ९० एवढ्या मताधिक्याने पराभव केला. महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांना १ लाख ३८ हजार ६८ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना ४८ हजार १९४ मते मिळाली.अपक्ष उमेदवार डॉ.रोहन बोरसे यांना २८ हजार १०८ अशी मते मिळाल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक यांना २२ हजार १२० मते मिळून ते चवथ्या स्थानावर राहिले.

निवडणूक जाहीर झाल्यापासून चौरंगी लढतीची अटकळ व्यक्त होत असताना कांदे यांनी अक्षरशः एकहाती वर्चस्व मिळविले. गेल्या निवडणुकीत विजयी होताना जेवढी मते घेतली,त्यापेक्षाही जास्त विक्रमी मते घेण्याचा विक्रम त्यांनी स्थापित केला.या निवडणुकीला मोठे हायव्होल्टेज स्वरूप मिळाले होते.लाडकी बहीण योजना,शिव महापुराने कथा,करंजवन नळ योजना या मुद्द्यांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला व अपेक्षेपेक्षा जादा मताधिक्य सुहास आण्णा कांदे यांना मिळाले.

या निवडणुकीत भयमुक्त नांदगावचा नारा देण्यात आला तसेच जातीय सामाजिक समीकरणे प्रभावी ठरतील,असे चित्र दिसत असताना आ. सुहास आण्णा कांदे यांनी हे सर्व मुद्दे खोडून आपण जनतेतलेच आहोत, हे आज या विजयानंतर दाखवून दिले

शनिवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपासून पासून मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरीत सुहास कांदे यांना सहा हजार ५१५ मते मिळाली व पहिल्या फेरीत तीन हजार ९३२ चे मताधिक्य घेत अखेरच्या पंचविसाव्या फेरीपर्यंत ते टिकवित ९० हजारांवर नेले. प्रतिस्पर्धी उमेदवारांत भुजबळ,डॉ.रोहन बोरसे व गणेश धात्रक यांचा क्रम पन्नास हजारांच्या आतच राहिला.अखेरच्या फेरीपर्यंत सुहास कांदे यांनी आपली निर्णायक मताधिक्याची आघाडी कायम राखली.पोस्टल मतांमध्येही सुहास अण्णा कांदे यांचेच वर्चस्व राहिले. शेवटच्या २५ व्या फेरीपर्यंत सुहास आण्णा कांदे यांनी ९० हजार ९० मतांनी आघाडी घेतली. सकाळी संथ गतीने सुरु झालेली मतमोजणी शेवटची फेरी संपेपर्यंत तशीच होती.

प्रतिक्रिया…
आज मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या कामांची मला पावती मिळाली,मी कधीही अपेक्षाभंग करणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन राहिलेला विकासपूर्ण करणार.तालुक्यात पाणी आणण्याचा प्रयत्न करणार,तरुण महिलांच्या हाताला काम देणार.नांदगाव तालुका सुजलाम् सुफलाम् करणार

सुहास आण्णा कांदे, विजयी उमेदवार

वैशिष्ट्ये

निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
• मतमोजणीबाबत माहिती देण्यासाठी असहकार्य
• व्हॉट्सअप ग्रुपवर मतदानाच्या आकडेवारीबाबत पोस्ट व्हायरल
@@@@@

विजयाची कारणे…
जेष्ट नेते बापूसाहेब कवडे यांचे मार्गदर्शन नांदगाव मतदारसंघातील माजी आमदार अनिल आहेर,राजेंद्र देशमुख,संजय पवार या माजी आमदारांसह शिवसेना (शिंदे गट),भाजपची प्रमुख नेते मंडळी सोबत घेत व आ.सुहास आण्णा कांदे यांच्यासह पत्नी सौ अंजुमताई कांदे व कुटुंबीयांनी सुयोग्य असे नियोजन केले.ही निवडणूक उभी करताना अगदी छोट्यातल्या छोट्या घटकाला सोबत घेण्याची किमया शिवसेनेचे उमेदवार आ.सुहास आण्णा कांदे यांनी साधली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेवटच्या टप्प्यातील नांदगाव ला सभा झाली.या सभेत आ.सुहास आण्णा कांदे यांना ‘आमदार’ म्हणून पुन्हा मागच्या निवडणूक पेक्षा तीन पटीने मतक्याधिकाने निवडून द्या, या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाचा प्रभाव,लाडकी बहीण योजना,मतदारसंघातील सोडविलेला पाणीप्रश्न,महापुरुषांचे पुतळे या सगळ्यांमुळे आ.सुहास आण्णा कांदे यांच्या विजयाचे गणित सोपे झाले.

प्रचारात प्रभावी ठरलेले मुद्दे…

■ भयमुक्तीपेक्षा विकासाला मतदारांकडून मान्यता.
■ करंजवण योजनेला चालना मिळाल्याचा प्रभाव.
■ कोट्यवधींची कामे पुढे नेण्यासाठी टाकलेला विश्वास.
।■ सर्वपक्षीय एकजूट, तळागाळात संपर्काचा परिणाम.
■ मतदारांना सहज उपलब्ध होणे,जनतेशी बोलणे भावले.

★★★★★★★
विजयी उमेदवार सुहास आण्णा कांदे

मिळालेली मते १,३८,०६८ मताधिक्य – ९०,०९०
पराभूतांना मिळालेली मते
■ समीर भुजबळ……….अपक्ष
४८,१९४
■ डॉ. रोहन बोरसे …..अपक्ष.
२८,१०८
■ गणेश धात्रक शिवसेना ठाकरे.
२२,१२०
■ आनंद शिनगारे……….वंचित बहुजन.
२,१५४
■ वैशाली व्हडगर…….अपक्ष
९८६
■ गौतम गायकवाड ….. बसप
७१६
■ फिरोज शेख करीम… अपक्ष.
५१०
■ वाल्मीक निकम .अपक्ष.
३९५

टपाली मतदान
• सुहास आण्णा कांदे ८११
• समीर भुजबळ २८६
• डॉक्टर रोहन बोरसे २९४
• गणेश धात्रक २५१

फोटो ओळ
नांदगाव : विजयानंतर कार्यकर्त्यांसह आनंद साजरा करताना विजयी उमेदवार सुहास आण्णा कांदे, सौ अंजुमताई कांदे.आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.