बाणगावं बुद्रुक येथे श्री बाणेश्वर जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण
नागरिकांना शुद्ध पाणी देण्याची ग्रामपंचायतीने घेतली हमी...

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
बाणगाव बुद्रुक :ता .२० येथे ग्रामपंचायतीने उभारलेल्या श्री बानेश्वर जलशुद्धीकरण केंद्र (आरओ प्लांट )चे उद्घाटन ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे,माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभाताई कवडे यांच्या हस्ते झाले.
बाणगाव बुद्रूक ग्रामपंचायतीने सन २०२३-२४ च्या पंधराव्या वित्त आयोगाच्या अंतर्गत ३ लक्ष रूपये च्या खर्चातून उभारलेल्या श्री बाणेश्वर जलशुद्धीकरण (आरो पलंट) प्रकल्पातून गावतील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी हमी ग्रापंचायतीने घेतली असून या केंद्रातून १ रुपयात १ लिटल पाणी व अवघ्या १० रुपयात नागरिकांना १८ लीटर शुद्ध पाणी दिले जाणार आहे ग्रामपंचायतने २०० एटीएम कार्ड तयार केले आहे यात १०० रूपये पासून ते १००० रूपये पर्यंत चे रिचार्ज असलेले कार्ड तयार केले आह.या एटीएम कार्डचा नागरीक कधीही हवे तेव्हा शुध्य पाणी नेणार आहे या जलशुध्दीकरण लोकार्पण दिवशी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शोभाताई कवडे यांच्या हस्ते नागरिकांना ए.टी.एम कार्ड चे वाटप करण्यात आले यावेळी बहुसंख्य नागरिकांनी ए टी एम कार्ड घेतले

असल्याची माहिती सरपंच संगिता बागुल व उपसपंच अलका कवडे, ग्रामसेवक युवराज निकम यांनी यांनी दिली
यावेळी ज्येष्ट नेते बापुसाहेब कवडे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शोभाताई कवडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे सरपंच संगिता बागुल उपसरपंच अलका कवडे ग्रामपंचायत सदस्य नारायण कवडे,शांताराम काका कवडे,सुनील कवडे, रावसाहेब बागुल,ग्रामपंचायत सदस्या जन्याबाई कवडे,वैशाली कवडे सुनिता देवकर,पल्लवी घोडके,अंगणवाडी सेविका सुशीला कवडे, पोलीस पाटील वाल्मीक बोराडे सागर बागुल,माजी सरपंच भाऊसाहेब कवडे,शांताराम पाटील,चांगदेव देवकर मोहनराव कवडे,प्रभाकर कवडे,रवींद्र कवडे,अशोक कदम,दिलीप कवडे सुखदेव कवडे,संजय फणसे,राजेंद्र कवडेअतुल कवडे संदीप कवडे, प्रमोद घोडके,विकास कवडे,ज्ञानदेव कवडे,सुदाम कवडे,बाळासाहेब कवडे, शिवदास कवडे,अशोक फणसे ओंकार कवडे,अनिल देवकर बाप पवार,संजय लासुरे,अशोक पवार,ईश्वर फणसे,रवी देवकर, अर्जुन देवकर,बापू बागुल रघुनाथ बागुल आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
१)बाणगावं बुद्रूक – येथे ग्रामपंचायतच्या १५ वित्त आयोगाच्या अंतर्गत श्री बानेश्वर जलशुद्धीकरण केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शोभाताई कवडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे सरपंच संगीता बागुल उपसरपंच अलका कवडे व ग्रामपंचायत सदस्य ,नागरिक आदी
२) नागरीकांना ए टी एम कार्ड चे वाटप करताना जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शोभाताई कवडे समवेत ज्येष्ट नेते बापुसाहेब कवडे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नागरीक



