मनमाड नगरपरिषद 2025 : शिवसेना–भाजप–आरपीआय महायुतीची घोषणा
मनमाडमध्ये महाविकास – महायुतीची भक्कम तयारी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
मनमाड | प्रतिनिधी ता 16 मनमाड नगरपरिषद निवडणूक 2025 साठी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आर.पी.आय., पीपल्स रिपब्लिकन पार्टी तसेच इतर मित्रपक्षांनी एकत्र येत महा-युतीची औपचारिक घोषणा केली आहे.
ही घोषणा नांदगाव येथील आमदार सुधीर (सुहास) अण्णा कांदे यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत करण्यात आली. मनमाड नगरपरिषद निवडणूक शिवसेना–भाजप–आरपीआय महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येणार असल्याचे बैठकीत जाहीर झाले.
बैठकीत भाजप व शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये –
नंदकुमार खैरनार – भाजप नाशिक जिल्हा उत्तर महामंत्री
पंकज खताळ – नांदगाव विधानसभा निवडणूक प्रमुख
सचिन दराडे – माजी नाशिक जिल्हा उत्तर महामंत्री
दत्तराज छाजेड – व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष
सुनील हांडगे – शिवसेना उपजिल्हाप्रमुख
फरहान खान – युवासेना जिल्हाप्रमुख
साईनाथ गिडगे – तालुकाप्रमुख
मयूर बोरसे – मनमाड शहर प्रमुख
योगेश इमले – युवासेना मनमाड शहर प्रमुख
या महायुतीमुळे मनमाड नगरपरिषद निवडणुकीत सत्तेवर मात करण्यासाठी विविध पक्षांची संयुक्त, भक्कम आणि रणनीतीनुसार आखलेली तयारी सुरु झाली आहे.





