“नांदगाव पालिकेत अभूतपूर्व बिनविरोध विजय! पहिल्यांदाच सात नगरसेवकांची इतिहासात नोंद”

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता 21– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध निवड होणं ही विरळच घटना.पण नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत एकाचवेळी तब्बल सात नगरसेवक बिनविरोध विजयी ठरल्याने सर्वत्र याची चर्चा रंगली आहे.पालिकेच्या शतकोत्तर इतिहासात कधीही न घडलेला हा विक्रम यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला.
एरवी प्रभागनिहाय होत असलेल्या कठीण स्पर्धेत ‘बिनविरोध’ हा शब्द ऐकूही न येणाऱ्या नांदगावात यंदा घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण केले आहे. या संपूर्ण प्रक्रियेच्या मागे आमदार सुहास कांदे यांच्या सूक्ष्म नियोजनाचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या धोरणात्मक नियोजनामुळे शिवसेनेने पहिल्या टप्प्यातच सात जागांवर बिनविरोध विजय मिळवत विक्रम रचला.
—
नांदगाव नगरपरिषद – उमेदवारांची यादी (नगराध्यक्ष व प्रभागनिहाय)
नगराध्यक्ष पद:
• सागर मदनराव हिरे – शिवसेना
• राजेश भीमराव बनकर – राष्ट्रवादी काँग्रेस
बिनविरोध निवडून आलेले शिवसेना नगरसेवक
1. खान जुबेदा बी गफ्फार खान – प्रभाग ८ (शिवसेना)
2. वंदना चंद्रशेखर कवडे – प्रभाग ६ (शिवसेना समर्थक अपक्ष)
3. शोभाताई विजय कासलीवाल – प्रभाग ४ (शिवसेना)
4. योगिता सचिन खरोटे – प्रभाग ४ (शिवसेना)
5. स्वाती अमोल नावंदर – प्रभाग २ (शिवसेना)
6. किरण जयप्रकाश देवरे – प्रभाग ६ (शिवसेना)
7. दीपक प्रमोद पांडव – प्रभाग २ (शिवसेना)


चौकट : ऐतिहासिक विक्रम
पालिकेची स्थापना झाल्यापासून इतक्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक बिनविरोध निवडले जाण्याची घटना कधीच घडली नव्हती. शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सात नगरसेवक एकाचवेळी बिनविरोध विजयी झाले असून नांदगाव पालिकेच्या वाटचालीतील ही ऐतिहासिक नोंद ठरली आहे.



