महाराष्ट्र

नांदगावला अज्ञात खोडसाळ व्यक्तीने काडी फेकल्याने लागलेल्या आगीत शेतकऱ्याचा चारा भस्मसात

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता १२ जनावरांसाठी चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवर पेटती काडी फेकल्याने शेतकऱ्याचा चारा लागलेल्या आगीत भस्मसात झाला सुदैवाने ट्रॅक्टर चालक शेतकऱ्याने प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अनर्थ थोडक्यात टाळला गेला ही घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमाराला मालेगाव रोडवरील न्यू इंग्लिश स्कुल समोरील रस्त्यावर घडली पानेवाडी येथील शेतकरी समाधान सांगळे हे पळाशी येथील ज्ञानेश्वर सानप यांच्याकडून आपल्या ट्रॅक्टर ( एमएच ४१ डी ४८६५)ने पानेवाडीकडे जात असताना त्यांच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली मधील चाऱ्याच्या गंजीला आग लागलेली बघून रस्त्याने जाणाऱ्या अन्य वाहनधारकांनी सांगळे याना हे लक्षात आणून दिले ट्रॉलीला लागलेली आग वाऱ्यामुळे सर्वत्र पसरली त्यांनी जागेवर ट्रॅक्टर थांबविला हे बघून सचिन आहेर,कृष्णा राऊत,विष्णू राऊत भावराव सोनास आदींसह आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला आग लागलेल्या ट्रॉलीपासून ट्रॅक्टर बाजूला घेतले मात्र ट्रॉलीतली लागलेली आग धुमसत होती तेथून जवळच असलेल्या भगवान राऊत यांच्या सर्व्हिस स्टेशनला पेटलेल्या ट्रॉली आणल्यावर मोठ्या महत प्रयासांनंतर हि आग आटोक्यात आली दरम्यान एकीकडे पाण्याची भ्रांत, त्यात दुष्काळाचे सावट अशा परिस्थितीत पाळीव पशुधनासाठीच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असल्याच्या पार्श्वभूमीवर मुक्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी मेटाकुटीला आलेल्या शेतकरी सांगळे यांचे अज्ञात विकृत व्यक्तीच्या खोडसाळपणामुळे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे

फोटो ओळी
नांदगाव:- येथील न्यू इंग्लिश स्कुलजवळ चारा वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला लागलेली आग

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.