आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

शिवसेना उमेदवार आमदार सुहास आण्णा कांदे यांनी बाणगावला फोडला प्रचाराचा नारळ ‪

विकास कामाच्या जोरावर सुहास आण्णांचा विजय निश्चित : जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.06 शिवसेना पक्षाचे व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी ता.०५ रोजी बाणगाव येथील ग्रामदैवत श्री बाणेश्वरच्या चरणी नारळ फोडून केला.नांदगाव विधानसभा मतदार संघात २०१९ वर्षाप्रमाणे या वर्षीही यश देवो,असे साकडे घातले.यावेळी जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे,माजी सभापती तेज कवडे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार सुहास कांदे यांनी सांगितले की,गेल्या वेळेस ही याच श्री बाणेश्वराच्या चरणी येऊन प्रचाराचा नारळ वाढवला होता. श्री बाणेश्वराची कृपा अन जेष्ठ नेते बापूसाहेबांचा आशीर्वाद यामुळे मी नवखा असतानाही आमदारकीची निवडणूक जिंकलो होतो. असे म्हटले जाते की,ज्याच्या डोक्यावर जेष्ठ नेते बापूसाहेबांचा हात असतो तोच आमदार होतो.आणि हा अनुभव माझा स्वतःचा आहे.असे महायुतीचे उमेदवार आमदार सुहास आण्णा कांदे यावेळी म्हणाले.

यावेळी जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे म्हणाले की, श्रीक्षेत्र श्री बाणेश्वर देवस्थानच्या विकासासाठी आमदार सुहास आण्णानी दोन ते अडीच कोटीची निधी दिला आहेत.तसेच गावात ही जवळपास तीन कोटीच्या आसपास कामे झाली आहेत. विकास कांमांच्या जोरावर सुहास अण्णांची आमदारकी आजच निश्चित आहे.उपस्थित ग्रामस्थांना उद्देशून म्हणाले आपण आहातच पण मतदार संघातील आपल्या नातेवाईकांना ही सांगा..असे ते शेवटी म्हणाले.

यावेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार अतुल कवडे यांनी केला तर सौ अंजुमताई कांदे यांचा सत्कार बाणगाव बुद्रुक च्या थेट सरपंच संगीता बागुल यांनी केला
यावेळी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे, समाजसेविका सौ.अंजुमताई कांदे,सौ.सुजाता कातकडे, फरहान खान,भाऊसाहेब कातकडे,बबलू पाटील, शाईनाथ गिडगे,महेंद्र शिरसाठ,प्रमोद भाबड,अमोल ऑड विद्या जगताप,रोहिणी मोरे,सरपंच संगीता बागुल,उपसरपंच अलका कवडे,माजी उपसरपंच नारायण कवडे, सुनील कवडे,शांताराम कवडे,रावसाहेब बागुल,पल्लवी घोडके,सुनीता देवकर,वैशाली कवडे,प्रभाकर कवडे,संजय फणसे,दिलीप कवडे, चांगदेव देवकर,संदीप कवडे,अभिमन कवडे,किशोर देवकर,भावराव कवडे, प्रमोद घोडके,संभाजी हिरे,रमेश कवडे,वसंत कवडे,संजय लासूरे,आदीसह शेकडो ग्रामस्थ,शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पूजेचे पौरोहित्य राहुल रत्नपारखी, पंकज कुलकर्णी,अरुण जोशी, प्रथमेश कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी,यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.