नांदगाव – येवला रस्त्याचे काम निकृष्ट
बाणगावला काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्याला पडल्या भेगा

गर्जा महाराष्ट्र 24न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.२० कौळाणे फाटा ते – नांदगाव- येवला रस्ताचे हायब्रिड अॅन्युइटीमधून मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १२० कोटी रुपये खर्चाची मंजुरी मिळूनही चार वर्षांपासून नियोजित रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून.या रस्ताचे बाणगाव येथे काँक्रीटीकरण चे काम सुरु आहे.मात्र सदर काम सुरू असतानाच काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने या कामाच्या दर्जाच्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.रस्ता बांधकामात वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागच्या अंतर्गत नांदगाव ते येवला रस्त्याचे काँक्रीटीकरण-डांबरीकरणाचे काम मंद गतीने सुरू आहे.बाणगाव बुद्रुक येथे रस्त्याचे काँक्रीटीकरनाचे काम कधी सुरू ते कधी बंद असते झालेले काम ही अंदाजानुसार केले जात नाही किंवा त्याचे नियम पाळले जात नाही रस्ताचे काम करताना संबंधित ठेकेदाराने दक्षता घेतलेली नाही एका बाजूचे काँक्रीटीकरणचे काम पूर्ण झाल्यावर झालेल्या या कामावर य गोणपाट आधरून दररोज पाणी मारून क्युरिण करणे गरजेचे होते व यावर वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने वाहतूक करणे क्रमप्राप्त असताना याकडे ठेकेदारांने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे काँक्रीटीकरण झालेल्या कामावर दररोज पाणी न मारता क्युरिण केलेली नाही व हा रस्ता लगेच वाहतुकीसाठी खुला केला आहे क्युरिण पुरेसे न झाल्याने हे काम परिपक्व होण्या अगोदर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहे ,रस्ता काँक्रीटीकरण झाल्यावर रस्त्याच्या साईट पटरीवर हार्ड मुरून टाकणे अपेक्षित असताना तिथे काळी माती टाकली आहे ही माती रस्त्यावर आल्याने पावसाच्या पाण्याने चिखल झाला असून यावरून वाहन चालक घसरून पडत आहे,बाणगाव गावात येवला रस्त्याला जोडण्याऱ्या रस्त्याचा काही भाग मजबूत करणे अपेक्षित असताना तिथे ही कामे सोडून देण्यात आले आहे यामुळे नागरिकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.तर पुलाच्या ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे या ठिकाणी सूचना फलक लावलेला नाही
ज्या ठिकाणी डांबराचा लेअर झाला आहे तेथे रस्ता उंच झाला आहे.पण,रस्त्याशेजारी सिमेंट नाली नसल्याने पावसाचे पाणी कसे जाणार,हा प्रश्न आहे.विशेष म्हणजे या रस्त्याची ज्यांच्याकडे देखभाल दुरुस्तीसह नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या येवल्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरावस्थेकडे कानाडोळा केला आहे येवला येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधितांना फोन लावून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर फोन उचलला जात नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.या रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून मंजूर असून,बांधकाम विभागाच्या नव्या धोरणानुसार हायब्रीड अॅन्युइटीमधून हे काम विहित मुदतीत करण्याचे बंधन संबंधित मक्तेदार फर्मवर असून,कधी कोरोनामुळे तर कधी बाजारभावात होणारी मूल्यवाद अशा वेगवेगळ्या सबबीखाली या रस्त्याच्या कामात कालहरण करण्यात येत आहे.जुन्या तहसीलपासून विवेकानंद नगरपर्यंत या रस्त्याच्या कामाला अजूनही मुहूर्त लागलेला नाही
…….
प्रतिक्रिया
नांदगाव – येवला रस्त्याचे बाणगाव बुद्रुक येथे रस्ता काँक्रीटीकरण काम निकृष्ट दर्जाचे होत आहे या रस्त्यावर पाणी मारले जात नाही काँक्रीटीकरण झालेला रस्ता लगेचच वाहतुकी साठी खुला केला आहे या रस्त्यावर भेगा पडल्या आहे हा रस्ता लगेच उखडून जाईल या रस्त्याच्या कडेला हार्ड मुरूम टाकणे अपेक्षित असताना ठेकेदाराने काळी माती टाकत आहे या कामात गैर प्रकार होत आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या कामाची चॉकशी करून या कामात सुधारणा करावी अन्यथा ग्रामस्थतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात यईल.
बापुसाहेब कवडे – जेष्ठ नेते नांदगाव
फोटो ओळ
नांदगाव -येवला रस्ताचे बाणगाव बुद्रुक येथे काँक्रीटीकरण कामास गेलेल्या भेगा