आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

नांदगावला नगराध्यक्ष पदासाठी दहा अर्ज दाखल; शिवसेनेचा एबिफॉर्मचा ट्विस्ट

भाजपचा पदाधिकारी राष्ट्रवादीचा उमेदवार शिवसेनेकडून भाकरी फिरवत नव्या चेहऱ्यांना वाव; उबाठा कडून संतोष गुप्ता

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव,ता १७ पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी आज अखेर एकूण दहा अर्ज दाखल झाले असून दहा प्रभागातून नगरसेवक पदासाठी एकूण ऐंशी अर्ज दाखल झालेत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा असल्याने इच्छुकांची अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी पालिकेच्या निवडणूक शाखेत उसळली होती

आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे एबी फॉर्म मिळविण्यासाठी इच्छुकांची चढाओढ दिसून आली समृद्धी बँकेच्या अध्यक्षा सौ अंजूमताई कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी चांडक प्लाझा येथून पायी रॅली काढली व पालिका कार्यालयात जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सैंदाणे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शामकांत जाधव यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले शिवसेनेकडून अनुक्रमे सागर मदनराव हिरे राजेश रामराव कवडे अरुण शंकरराव पाटील किरण जयप्रकाश देवरे या चौघांनी थेट नागरध्यक्षपदासाठी आपले अर्ज दाखल केले असले तरी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मात्र सागर हिरे व राजेश कवडे या दोघांना दिला गेल्याने शिवसेनेचा थेट नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार कोण असेल याबद्दलचा सस्पेन्स कायम राहिला आहे त्यासाठी सगळ्यांचे लक्ष उद्याच्या छाननीकडे लागले आहे दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना भाजपा अशी युती झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीत असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपला पत्ता ओपन करीत मूळ भाजपाचे असलेले माजी नगराध्यक्ष राजेश भीमराव बनकर याना आपल्या कळपात खेचत त्यांना थेट नगराध्यक्ष पदासाठी ची उमेदवारी बहाल केली विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या राजेश बनकर यांनीही भाजपचा त्याग करीत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर संतोष मधुकर गुप्ता यांनी उबठाकडून आपला नागरध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल केला थेट नगराध्यक्षपदासाठी राजेश रामराव कवडे विक्रम चंद्रशेखर कवडे धीरज राजेंद्र मोकळ अशा तिघांनी अपक्ष म्हणून आपले अर्ज दाखल केले तर एकूण दहा प्रभागातील नगरसेवक पदासाठी ऐंशी अर्ज दाखल झाले आहेत दरम्यान महायुतीकडून पालिका निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यावरून रस्सीखेच सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उबाठा व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निरव शांतता बोलकी ठरली अपवाद म्हणून काँग्रेकडून मनोज चोपडे व शरद जाधव या दोघांनी प्रभाग तीनमधून पक्षच्या वतीने एबी फॉर्म मात्र जोडले आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.