ताज्या घडामोडी

पत्रकार राजेंद्र दिघेंच्या ‘शाब्बास गुरुजी’ ला राज्यस्तरीय ग्रंथरत्न पुरस्कारने सन्मानित….

गर्जा महाराष्ट्र २४न्यूज वृत्तसेवा

मालेगाव ता. ०६ : येथील उपक्रमशील शिक्षक,व दैनिक ‘सकाळ’चे मालेगाव शहर बातमीदार राजेंद्र दिघे यांच्या’शाब्बास गुरुजी’ या लेखसंग्रहास सांगली येथील प्रतिष्ठा फाउंडेशनतर्फे ‘प्रतिष्ठा राज्यस्तरीय ग्रंथरत्न पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले.

रविवारी (ता .४) तासगाव येथे आयोजित आठव्या राज्यस्तरीय प्रतिष्ठा साहित्य संमेलनात प्रसिद्ध साहित्यिक समीक्षक डॉ. सुनीलकुमार लवटे व सांगलीचे खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष तानाजी जाधव उपस्थित होते. श्री राजेंद्र दिघे यांचा ‘काळ्या आईची तहान’हा काव्यसंग्रह प्रकाशित असून,”शाब्बास गुरूजी” या पुस्तकाला यापूर्वी दोन पुरस्कार मिळाले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.