ताज्या घडामोडी

मनमाडला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

गर्जा महाराष्ट्र २४न्यूज वृत्तसेवा

मनमाड ता.०७ तब्बल ४० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न आज पूर्ण होत असून आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आले संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या मंगलदिनी आज बुधवारी (ता.७) दपारी १२ ला साजरा होणार आहे.यानिमित्त आंबेडकरी अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याने मनमाड शहर अवखे निळेमय झाले आहे.

शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बसवलेल्याअर्धाकृती पुतळ्याला ५९ वर्ष झाले आहे.मनमाड शहर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र राहिल्याने गेल्या ४० वर्षापासून पूर्णाकृती बसविण्यात यावा ही मागणी होत होती, आमदार सुहास कांदे यांनी ही मागणी तडीस नेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना त्यात यश आले,आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून शहरातील रेल्वे स्टेशन गेट समोर संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक उभारण्यात आले आहे.

शहरातील एकात्मता चौकासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात जगविख्यात पुज्य भन्ते डॉ.राहुल बोधी महास्थवीर यांच्या हस्ते आणि आमदार सुहासआण्णा कांदे,समाजसेविका सौ अंजुमताई कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.पुतळा लोकार्पणप्रसंगी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता एकात्मता चौकात होणार आहे.लोकार्पण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक आमदार सुहासआण्णा कांदे आणि समाजसेविका सौ अंजुमताई कांदे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.