ताज्या घडामोडी

गॅसच्या इस्त्रीने कपड्यांची आणि त्यांच्या आयुष्याची घडी घातली

बहती नदिया..

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

बहती नदिया
(संजीव धामणे)
वयाच्या ६२ व्या वर्षी तब्बल सात किलो वजनाची नांदगाव शहरातली जड इस्त्री थकत चाललेल्या हातांनी फिरवतांना अशोक थोरात यांना आताच कुठे सूर गवसला होता.हातातली जड इस्त्री कपड्यावरून फिरवतांना, दुकान खाली करण्याची नोटीस मिळाली.आर्थिक सुरकुत्या मोडून संसाराची घडी बसवितांना नाकी नऊ आले तरी,लोकांच्या कपड्यांची सुरकुती मोडून त्यांची घडी बसविणारी त्यांची इस्त्री,आज पुन: नवा आसरा शोधण्यासाठी निघाली.
शिकतांना रेल्वेच्या सिग्नल विभागाचे खलाशी,पाटबंधारे खात्यातली अल्पजीवी नोकरी,पुणे शहरात रोजगार हमी योजनेवर मस्टर कारकून, पुणे,कोल्हापूर,फलटण,जेजुरी,नाशिक येथे नोकरी व लौंड्रीत कपड्यांची धुलाई,मशीन साडी प्रेस,स्टीम प्रेस यांचे आधुनिक शिक्षण घेत असतांना ब्लेजर,शेरवानी,घागरा यासारख्या फॅशनेबल कपड्यांची इस्त्री करण्याचे आधुनिक शहरी आयाम अनुभवायला मिळाले.
लौंड्रीच्या विविध क्षेत्रातील प्राविण्य मिळवले खरे पण पोटाने अनेक शहरे फिरवली.वेठबिगार पद्धतीनेच वागणूक मिळायची.यामुळे लोखंडाचे चणे पचविण्याची ताकद निर्माण झाली.इस्त्रीची मजुरी चार रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत तर,मालक ग्राहकाकडून किमान १२ रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत पैसे कमवत होते.शेवटी पुन: नांदगाव गाठले. रेल्वे लाईन जवळ टपरी टाकली.अतिक्रमण हटाव मोहिमेत तिचा बळी पडला. म्हणून जुन्या पंचायत समितीजवळ १२०० रुपये भाड्याने घेतलेली टपरी ही अतिक्रमणाची निघाली. आयुष्यभराच्या भटकंती नंतर मोक्याच्या जागी मिळालेले दुकान ही गेले.मात्र एलपीजी गॅस(स्वयंपाकाचा) वर चालणारी अशोकरावांची सात किलोंची इस्त्री सर्वांच्या आकर्षणाचा व त्यांच्या जीवनाधाराचा विषय आहे.हैद्राबाद येथून आणलेली सात किलो वजनाच्या इस्त्रीचा तळ पाच ते सहा मजबूर पितळी प्लेटसने बनलेला आहे. वरच्या बाजूला असलेल्या छिद्रातून लायटर किंवा आगपेटीची जळती काडी आत सरकवली कि,भुर्रकन जाळ निघतो आणि इस्त्री गरम होते. कपड्यावर पाण्याचा फवारा मारला कि,काम झालेच.२००० रुपयांच्या कमर्शियल टाकीत १९ किलो गॅस असतो.१५०० तरी कपडे होतात.
• गॅसची इस्त्री आंध्र प्रदेशातल्या वारंगळ जिल्ह्यातल्या अलायगुरम नावाच्या लहानशा गावात राहणाऱ्या के.लिंगब्रह्मम यांनी पहिल्यांदा बनवली. तापलेल्या तव्यावर इस्त्री ठेवून ती गरम झाली कि, कपड्यांवरून फिरवायची हा आपल्या टेलर मित्राचा उद्योग बघून त्यांच्या डोक्यात कल्पना आली.एल.पी.जी.गॅसवर चालणारी इस्त्री तयार केली तर? त्यातून या इस्त्रीचा जन्म झाला.
• एक तासभर इस्त्री करण्यासाठी केवळ १० ग्रॅम गॅस पुरतो.
• नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनने लिंगब्रह्मम यांना एल.पी.जी.गॅसवर चालणाऱ्या इस्त्रीचं एकस्व घेण्यासाठी मदत केली.इस्त्रीमुळे त्यांच्या आयुष्याची घडीनीट बसली आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.