ताज्या घडामोडी

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, देशभरात आचारसंहिता लागू

इलेक्शन कमिशनकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर ,७ टप्प्यांत होणार मतदान; 4 जूनला मतमोजनी

गर्जा महाराष्ट्र 24 न्युज वृत्तसेवा

दिल्ली ता.१६ लोकसभा निवडणुकीचा २०२४ बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केली असून देशात एकूण सात टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे.

देशभरात अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल आज अखेर वाजला .आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून,देशात सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत.पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला तारखेला आहे,तर केंद्रात कुणाचे सरकार येणार,याचा निकाल चार जूनला लागेल.आयोगाकडून लोकसभा निवडणुकीप्रमाणेच देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचीही घोषणा करण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे राजीव कुमार म्हणाले.१६ जून रोजी मोदी सरकारचा कार्यकाळ संपत आहे. देशात जवळपास ९७ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत.त्यामध्ये ४९.७ कोटी पुरुष मतदार आहेत. या निवणुकीसाठी १०.५ लाख पोलिंग स्टेशन,५५ लाखांहून अधिक ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे.

आतापर्यंत लोकसभेच्या १७ निवडणुका आणि ४०० हून अधिक विधानसभा निवडणुका आतापर्यंत आयोगाकडून घेण्यात आल्या आहेत. मागील दोन वर्षांत आम्ही खूप मेहनत केली आहे.आता मदार तुमच्या हातात आहे. त्यामुळे मतदान करा, असे आवाहन राजीव कुमार यांनी केले.

असे होईल मतदान (कंसात मतदारसंघ) –

पहिला टप्पा – १९ एप्रिल (१०२)

दुसरा टप्पा – २९ एप्रिल (८९)

तिसरा टप्पा – ०७ मे (९४)

चौथा टप्पा – १३ मे (९६)

पाचवा टप्पा – २० मे (४९)

सहावा टप्पा – २५ मे (५७)

सातवा टप्पा – ०१ जून (५७)

महाराष्ट्रातील पाच टप्प्यांचा निवडणूक कार्यक्रम –

पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.