ताज्या घडामोडी

आज समाजात असलेली कुटुंबंव्यवस्था ही फक्त त्या – त्या धर्मामुळेच टिकवून: आमदार सुहास आण्णा कांदे

तरुण पिढीने मोबाईल वापराचा अतिरेक टाळून आयुष्यातील काही क्षण हे देव ,धर्मासाठी दिले पाहिजे.

गर्जा महाराष्ट्र २४ वृत्तसेवा

नांदगांव ता.२३ आज समाजात असलेली कुटुंबंव्यवस्था ही फक्त त्या – त्या धर्मामुळेच टिकून आहे.म्हणून धर्माचे काम मी यापूर्वीही केले अन आत्ता ही करत आहे,अन करतच राहणार असे प्रतिपादन नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले.

तालुक्यातील पिंप्राळा येथील २० भाविकांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली.त्यांचा सत्कार समारंभ आमदार सुहास कांदे यांचे हस्ते आज करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.तालुक्यात ज्या – ज्या ठिकाणी हरीनाम सप्ताह होतात.त्या प्रत्येक कीर्तनात माझा नामोल्लेख होतो.हे माझे भाग्य आहे.आणि म्हणूनच मी हिंदू धर्माच्यारक्षणासाठी,धर्मवाढीसाठी सतत कार्यरत असतो.आणि धर्माचे काम करत असताना यापूर्वी मी जवळपास साडे तीनशे वारकरी मंडळाना भजन,कीर्तनासाठी लागणारे साहित्य त्यांचा उचित असा सन्मान करून दिले आहे.आणि अजूनही देत असतो.हे देण्यामागे तरुण पिढीने मोबाईल वापराचा अतिरेक टाळून आयुष्यातील काही क्षण हे देव व धर्मासाठी दिले पाहिजे हाच एकमेव हेतू होता.

प्रसिद्ध कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज कदम म्हणाले की,आमदार सुहास अण्णांची पुढची पायरी मंत्रिपद आहे,त्यावर आ.श्री.कांदे म्हणाले की,तुम्ही सर्वांनी जे मत रुपी प्रेम व आशीर्वाद दिला त्यामुळे मी आमदार होऊ शकलो,यापुढे ही असेच प्रेम व आशीर्वाद द्या.धर्मासाठी तुम्ही जी जबाबदारी द्याल,ती मी निश्चितपणाने पार पाडेन,अशी ग्वाही देतो.असे ते शेवटी म्हणाले.

भाऊसाहेब ढोणे,काळू बेंडके,केशव सदगीर,जीवन सदगीर,वसंत सदगीर,गोविंद सदगीर,तुकाराम सदगीर,समाधान सदगीर,सूर्यभान चौधरी,अनिल खरे,काशिनाथ सदगीर,श्रीराम सदगीर,एकनाथ सदगीर,उत्तम चवंडगीर,नारायण सदगीर,लक्ष्मन सदगीर,सोमनाथ सदगीर,विठोबा सदगीर,डॉ.निलेश सदगीर,आदींचा सत्कार आमदार कांदे यांचे यांचे हस्ते करण्यात आला.कार्यक्रमास सरपंच,उपसरपंच,सोसायटी चेयरमन,व्हा.चेयरमन,सदस्य,यांच्यासह काळू शिंदे,वाल्मिक प्रमोद भाबड,सुनील जाधव,सागर हिरे,शशी सोनावणे,भावराव बागुल,प्रकाश शिंदे,आदिंसह शेकडो भाविक उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.