ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्यात आढळला बेवारस पुरुषाचा मृतदेह

गर्जा महाराष्ट्र २४ न्युजवृत्तसेवा

नांदगाव ता.२६ तालुक्यातील परधडी घाट शिवारात बेवारस पुरुषाचा मृतदेह सापडला असून,नांदगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत,नांदगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या बेवारस आढळलेल्या मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध नांदगाव पोलीस करीत आहे.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील परधडी घाट शिवारात बेवारस मृतदेह असल्याची माहिती सोमवारी (ता.२५) नांदगाव पोलिसांना माहिती समजली.नांदगाव पोलिस तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असता.मृतदेह पूर्णपणे कुजलेला मृत अवस्थेत अवस्थेत असल्याचे आढळून आले.

हा मृतदेह पुरुष जातीचा असून,याचा रंग सावळा आहे.तसेच ३० ते ४० वर्ष वय असल्याचा अंदाज आहे.अंगात आकाश रंगाची फुल बाईचा शर्ट, राखाडी रंगाची फुल जीन्स पॅन्ट,उंची अंदाजे पाच ते साडेपाच फूट असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.या अनोळखी मृतदेहाची कोणाला माहिती असल्यास नांदगाव पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आव्हान नांदगाव चे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी,सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बढे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.