ताज्या घडामोडी

आमदार सुहास आण्णा कांदें यांच्या स्वखर्चात उर्दू शाळेला रोहित्र

गर्जा महाराष्ट्र 24न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.21 तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील उर्दू शाळेच्या विद्यार्थीची विजपुरवठा अभावी शिक्षणाची हेळसांड होत असल्याची बाब आमदार सुहास आण्णा कांदे यांना समजतात त्यांनी तात्काळ तीन लाख ८० हजार रुपये किमतीचे वीज रोहित्र स्वखर्चातून बसवून दिल्याने,विद्यार्थी,पालक, शिक्षणप्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

बोलठाण येथील या उर्दू शाळेला वीजपुरवठ्याची सोय नसल्याने संगणक शिक्षणासह इतर सुविधा व तांत्रिक शिक्षणापासून हे विद्यार्थी वंचित राहत असल्याची बाब येथील शिवसेनेचे पदाधिकारी अनिल रिंढे व रफिक पठाण यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या निदर्शनास आणून दिले यावर आमदार सुहास आण्णा कांदे यांनी स्वखर्चातून सिंगल फेज वीज रोहित्र उपलब्ध करून देत शनिवारी शाळा व्यवस्थापन समितीच्या स्वाधीन केले.
यावेळी माजी सभापती विलासराव आहेर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील,फरहान खान,मजूर संघाचे संचालक प्रमोद भाबड,प्रकाश शिंदे,राजेंद्र देशमुख,बाळासाहेब आव्हाड,मुक्ती अब्दुल हाफिज,सादिक सय्यद,उबेद सय्यद,जुनैद शा.,उजेब शेख,शेख सलीम, अमजद सय्यद, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.