ताज्या घडामोडी

दोषी ग्रामविकास अधिकाऱ्यावर कार्यवाही करा तरच आम्ही उपोषण सोडू” मांडवडच्या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचा पवित्रा..

तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची उपोषण स्थळी भेट.

गर्जा महाराष्ट्र २४ वृत्तसेवा

नांदगाव ता.२८ नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील शेतकऱ्यांचे नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या गारपीटीने झालेल्या नुकसाची शासनाच्या वतीने अनुदान मिळाले आहे.पण या अनुदान वाटप प्रक्रियेत ग्रामविकास अधिकारी यांनी अनियमता करत भ्रष्टाचार केल्याचां संशय ग्रामस्थांनी व्यक्त करत संबधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणी घेवुन मांडवडच्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवारी (ता.२४ ) पासून सुरू केलेले बेमुदत उपोषण तहसिलदार व गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा होउनहि उपोषणकर्तेंचे समाधान न झाल्याने चौथ्या दिवशीहि सुरु आहे.

गुरुवारी ता.२८ रोजी उपोषण स्थळी तहसीलदार सुनिल सेंदाने व गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी यांनी भेट देत उपोषणकर्ते शेतकऱ्यांशी चर्चा केली व सदर प्रकरणात सखोल चौकशी करूनच चौकशीत दोषी अधिकऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देत उपोषण सोडण्यासाठी विनंती केली यावेळी उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी आधिकऱ्यांवर प्रश्नाची सरबती करत म्हणाले की गावात गुंठाभर जमीन नसणाऱ्यांच्या नावावर गारपीठ नुकसानीचे अनुदान मिळाले कसे ?आमच्या मूळ तक्रार अर्जाची दखल प्रशासनाने का घेतली नाही ? आम्ही माहितीच्या अधिकारांमध्ये माहिती मागितली असता आम्हास खोटी कागदपत्रे कशी दिली जातात,खोटे आवाहल कसे दिले जातात.संबधित ग्रामविकास अधिकारी यांची पाठराखण गटविकास अधिकारी यांनी का केली आहे असे विविध प्रश्न केलें

तसेच लाखो रुपयांचे भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांची तडकाफडकी बडतर्फी होत नाही,तसेच जे शेतकरी गारपिटीचा अनुदानापासून वंचित राहिले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच बनावट कागदपत्रे,खोटी माहिती दिल्याबद्दल संबंधितावर वरती कार्यवाही करावी जोपर्यंत आम्हास लेखी आश्वासन व दोषींवर कार्यवाही पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही.जितका वेळ तुम्हाला चौकशीसाठी पाहिजे तो तुम्ही घ्या परंतु उपोषणकाळात उपोषणकर्त्यांच्या जीविताला जर काही बरे वाईट झाले तर यास प्रशासनच जबाबदर असेल.या प्रकरणात योग्य ती कार्यवाही न झाल्यास आम्ही हायकोर्टात जनहित याचिका दाखल करू असे यावेळी उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी यांनी तहसीलदार यांना सांगितले.

प्रतिक्रीया….

चौकट
कायद्याच्या चौकटीच्या बाहेर केलेले प्रत्येक कृत्य हा गुन्हा आहे. सदर प्रकरणात संपुर्ण चौकशी झाल्याशिवाय कार्यवाही करता येत नाही.चौकशीत ग्रामविकास अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावर कार्यवाही करू येत्या गुरुवारपर्यंत सर्व चौकशी करून दोषींवर कार्यवाही करू.

सुनिल सैदाने – तहसीलदार नांदगाव

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.