महाराष्ट्र

५०० रु. च्या नोटेची गोष्ट….. जिद्दीचा एक विलक्षण प्रवास

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

बहती दुनिया (संजीव धामणे)

नांदगाव ता.२७ . ५०० रुपयांची चुरगळलेली नोट,फाटली,तुकडे झाले, तर ती सरळ करून,चिकटवून वापरता येते.तिचे मुल्य कमी होत नाही. ती तर नोट आहे.मी तर हाडामांसाचा माणूस आहे…अपयश आल्याने आपली किंमत कशी कमी होईल!…..अंतर्मुख झालेल्या तांदूळवाडीच्या दिनेश काळे यांनी अवघ्या दीड दशकात शून्यातून स्वत:चे विश्व निर्माण केले.त्यांचा प्रवास जिद्द आणि परिश्रमावर आधारित कहाणी आहे.

कहाणीची सुरवात रेल्वे प्रवासात झाली.भूक लागली म्हणून,स्टेशनवर पाववडा घेतला.तो वर्तमानपत्रात गुंडाळलेला होता.त्यावर ५०० रुपयांच्या फाटलेल्या नोटेची गोष्ट होती.गोष्टीतली नोट फाटलेली असून हि तिची किंमत कमी झालेली नव्हती.गोष्ट वाचून विचार व आयुष्यच बदलले. बस! माझी सुध्दा एक किंमत आहे.ती अजमाविण्याचा प्रवास सुरु झाला.

मामांकडून येवल्याला जाऊन वाहनांच्या पेपरचे (आरटीओ) काम घेऊन मालेगाव गाठायचे आणि संध्याकाळी नांदगावला परत यायचे.या कामाचे १०० रुपये मिळत.बसने दररोज नांदगाव, येवला व मालेगाव प्रवास सुरु झाला. दरम्यान वेळेची व पैशांची बचत करण्यासाठी मामांची भंगारात पडलेली दुचाकी दुरुस्त करून तिच्यावर प्रवास सुरु केला.

जम बसत होता म्हणून नांदगाव येथे एका टेलरकडे,कोपऱ्यात एक टेबल व तीन खुर्च्यामध्ये आरटीओ एजंट दिनेश काळे असे कार्यालय सुरु झाले.पुढे ते भाड्याच्या जागी एका बीबियाणे व खताच्या दुकानात स्थलांतरीत झाले.निमित्ताने शेतकरी वर्गात ओळखी झाल्या. रोजनिशी लिहिण्याच्या सवयीमुळे चुका कळू लागल्या होत्या. त्याने कामात सुधारणा होत गेली.

मामांनी पैशांपेक्षा फक्त तू लढ.मी तुझ्या पाठीमागे आहे,असे प्रोत्साहन दिल्याने व्याजाच्या पैशांनी अल्टो घेतली आणि पहिले ड्रायव्हिंग स्कूल काळेंनी सुरु केले.आरटीओचा व्यवसाय वाढत होता.तोपर्यंत सकाळी ७ ते संध्याकाळी ५ पर्यंत मालेगाव आणि नंतर ६ ते रात्री ११ वा. पर्यंत ड्रायव्हिंग स्कूलची गाडी शिकवणे असा कष्टप्रद काळ होता.

डोक्यात आले की, ते करायचेच…. २०१५ च्या जून महिन्यात, मला शाळा चालू करायची आहे, असा मामाकडे हट्ट धरला. तेव्हा दिनेश यांचे वय अवघे २४ होते. शिक्षण संस्था म्हणजे काय ते हि नीट माहिती नव्हते. दिनेश ते केल्याशिवाय राहणार नाही. याची खात्री असल्याने मामांनी पैशांची सोडून बाकी सर्व मदत केली. लोन काढून, उधार उसनवार पैसे आणून काळेंनी तांदूळवाडी येथे इंग्रजी मेडियम स्कूल सुरु केले. आजमितीस शाळेत ३५० विद्यार्थी, १६ शिक्षक, १० वाहन चालक,व इतर असा २९ जणांचा स्टाफ आहे.चार जण कार्यालयात आरटीओ ची कामे बघतात. त्यांच्या आईचा यशात वाटा आहे.

@@@@
• आपण चांगले असलो तर चांगलेच भेटतात.तंगडी ओढणाऱ्याशी मैत्री केली नाही……दिनेश काळे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.