महाराष्ट्र

परभणीत क्रंतिदिनी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व निदर्शने

कार्पोरेट भारत छोडो" या घोषणेची हाक

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

परभणी ता.10 “कार्पोरेट भारत छोडो” या घोषणेची हाक देत भारत छोडो क्रांतीदिना निमित 8 ऑगस्ट 2024 रोजी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर संयुक्त किसान मोर्चा (महाराष्ट्र)राज्यभर आंदोलन पुकारले होते याचाच भाग म्हणून किसान सभा परभणी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली.

स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी नुसार C2 +50% हमीभावाचा किसान आधारभूत किंमतीचा कायदा, शेतकरी शेतमजुरांना कर्जमाफी यासह शेतकऱ्यांच्या 17 महत्वपूर्ण मागण्याचे निवेदन मा. राष्ट्रपती तसे भारताचे प्रधानमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत देण्यात आले.

यावेळी करण्यात आलेल्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
1) स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी नुसार @C2 +50% हमीभावाचा किसान आधारभूत किंमतीचा कायदा करा.
2)शेतकरी शेतमजूर आणि कामगारांना कार्पोरेट कंपन्यां प्रमाणे संपुर्ण कर्जमाफी द्या.
3)WTO च्या दबावाला झुगारून कार्पोरेट धार्जिण व शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरण रद्दबादल करा.
4)कृषी निविष्ठा व खतावरील GST कर रद्द करा.
5)परभणी जिल्हातील हामाल माथाडी कामगारांचे थकीत वेतन तत्काळ अदा करा.
6)भुमी अधिग्रहण कायदा 2013 ची अमलबजावणी करा.
7)समृद्धी महामार्ग नांदेड – जालना तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करा.
8)थकीत पिकवीमा भरपाई तत्काळ अदा करा. 2023 परभणी जिल्हातील मधिल उर्वरित 75%पिकवीमा भरपाई द्या.
9)अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांच्या पिकांची व खरडलेल्या जमीनीची नुकसान भरपाई द्या.
10) 2022 पर्यंत सर्वासाठी घर योजने अंतर्गत दिल्या जानाऱ्या प्रधानमंत्री घरकुल योजनेची अंमलबजावणी करा. घरकुल योजने अंतर्गत थकीत रकमा तत्काळ अदा करा.
11) गंगाखेड शहरातील गौतमनगर भागातील प्रमोद मस्के सह न्याय अधिकारासाठी उपोषणास बसलेल्या नागरीकांना पिटीआर नक्कल तसेच घरकुल द्या.
12)पीक विमा योजनेत शेतकरी हिताला अनुसरून बदल करा
13) शेतकरी-शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करा.
14)प्रिपेड स्मार्ट मीटर योजना रद्द करा, विजेच्या खाजगीकरण रद्दबादल करा.
15) राज्यात सुरू असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनातील मागणीनुसार दुधाला 40 किमान रुपये लिटर द्या
16) परभणी जिल्ह्यासह राज्याच्या 14 जिल्ह्यांत रेशन बंद करण्याचे कारस्थान मागे घ्या. रोख नको धान्य द्या.
17)शिक्षण आणि आरोग्य संपूर्णपणे मोफत द्या.
निवेदक
यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ राजन क्षीरसागर यांनी संयुक्त किसान मोर्चा ने पुकारलेल्या आंदोलनाची सविस्तर भुमीका मांडली.प्रस्तावना किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी कॉ ओंकार पवार केली कॉ आब्दुल भाई,कॉ शिवाजी कदम कॉ प्रसाद गोरे,कॉ निळकंट जोगदंड,यांनी यावेळी विचार मांडले तर किसान सभेचे मधुकर गाडेकर,मितेश सुक्रे,देविदास खरात,दयानंद यादव,नारायण यादव कार्यकर्ते संजय शेळके,मावली मुंढे,गणेश मुंढे,फेरोज चाऊस,अरुण हरकळ, धोंडीराम लांबाडे,अच्युत चोपडे,त्र्यंबक वैरागर,अशोक जाधव यासह जिल्हाभरातील शेतकरी शेतमजूर हमाल माथाडी कामगार उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.