बाणगाव बु विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीत संपन्न

गर्जा महाराष्ट्र २४ वृत्तसेवा
बाणगाव बुद्रुक ता ०३ तालुक्यातील बाणगाव बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जेष्ट नेते बापूसाहेब कवडे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली
सर्वसाधारण सभेच्या वेळी सचिव बाळासाहेब पवार यांनी विषय पत्रिकेला अनुसरून प्रत्येक विषयाचे सविस्तर विवेचन केले
यावेळी ज्येष्ट नेते बापुसाहेब कवडे म्हणाले थकबाकीदार सभासदांच्या संदर्भात जिल्हा बँकेने वसुली संदर्भात अत्यंत कडक धोरण अवलंबिलेले असून थकबाकीदार सभासदावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम १०१ अंतर्गत वसुली दाखले प्राप्त झाले असल्या कारणाने थकबाकीदार सभासदांवर कायदेशीर मार्गाने वसुली करण्याचे अधिकार जिल्हा बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे त्यामुळे जप्ती करणे, जमिनीवर बोजे चढवणे अशा स्वरूपाची कायदेशीर कार्य होऊ शकते त्याकरिता सभासदांनी जिल्हा बँकेने सुरू केलेल्या एकरकमी कर्जफेड योजना लाभ घेऊन कर्जमुक्त होण्याचे आवाहन सभासदांना केले.
यावेळी अध्यक्ष तेच कवडे यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना म्हणाले की केंद्र सरकारने सहकारी संस्थांमध्ये आमुलाग्र बदल करून सहकारी संस्थांनी जवळपास १५० व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात केंद्राने सहकारी संस्थांना परवानगी दिली आहे सदर व्यवसाय करून संस्थाने कर्जवाटप हाच उद्देश सिमित न ठेवता वरील व्यवसायामधून नवे आव्हान स्वीकारून सभासदांना सेवेबरोबरच संस्थांचा आर्थिक पाया देखील भक्कम होईल असे सुचविण्यात आले आहे तसेच भविष्यात सहकारी संस्था संगणकीकृत करून संपूर्ण देशभरामध्ये एकच प्रकारची संगणक प्रणाली अस्तित्वात येत आहे त्याबाबतच्या संस्थांच्या व्यवहाराच्या माहिती भरणे हे काम अतिशय प्रगतीपथावर असून येत्या दोन-तीन महिन्यात सर्व विकास संस्था ऑनलाईन पद्धतीने कामकाज करणार आहे त्यामुळे कामाचे तत्परता तसेच बेकायदेशीर कामांना आपोआपच आळा बसणार आहे मागील चार-पाच वर्षापासून सभासदांना सरसकट कर्ज देणे बंद झाले आहे, त्यामुळे बहुतांशी सभासद हे कर्जापासून वंचित असल्याने आजच्या सभेत सभासदांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यावर संस्थेचे अध्यक्ष तेज कवडे यांनी सांगितले की सदर धोरण हे जिल्हा बँकेचे असल्याने तसेच रकमेची निधीची कमतरता असल्याने जिल्हा बँकेने नियमित सभासदांनाच कर्ज वाटप करण्याचे धोरण अवलंबलेले आहे भविष्यात जिल्हा बँकेस निधी प्राप्त झाल्यानंतर उर्वरित सभासदांना कर्ज वाटप करण्याबाबत संस्था निश्चितच धोरण अवलंबिल तसेच १०१ चे प्रकरण देवू नका, व्याज भरून आपले खाते नवे जुने करून घ्यावे .पीक कर्ज खंड पडणाऱ्यात सभासदाना पीक कर्ज देता येत नहीं या संदर्भात स्थानिक बँक शी चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल असे सांगीतले तसेच. सभासदांना आपले कर्ज वन टाईम सेटलमेंत मध्ये करून घ्याण्याचे आव्हान केले
प्रसंगी उपाध्यक्ष आभिमान कवडे,संचालक शांतारामकाका कवडे,प्रभाकर कवडे,परसराम कवडे,माजी उपसरपंच नारायण कवडे,चागदेव देवकर,भाऊराव कवडे,अतुल कवडे,रवींद्र देवकर,किशोर आहेर,प्रमोद घोडके,गणेश देवकर सचिव मच्छिंद्र कवडे भावराव देवकर,जयराम जाधव,भगवान कोळेकर राजुबाई कवडे,मैनाबाई आहेर,सुधाकर कवडे,बाळासाहेब कवडे,बाबासाहेब देवकर,प्रशांत कवडे,सुखदेव कवडे,
मच्छिद्र कवडे,वसंत कवडे,संदीप कवडे,संजय लासुरे जयराम जाधव,मच्छिंद्र कवडे,दिनेश कवडे आदी उपस्थीत होते
संस्थेचे सचिव बाळासाहेब पवार यांनी प्रास्ताविक व आभार मानले
फोटो ओळ
बाण गाव बुद्रूक – येथील बाणगाव बुद्रुक विविध कार्य सेवा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष तेच कवडे समयत ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, परसराम कवडे सचिव बाळासाहेब पवार
फोटो ओळ( बाणगाव बुद्रुक विविध कार्यकरी सेवा सोसायटी वार्षिक सर्वसाधारण स



