नांदगांव – चाळीसगाव रस्त्यावर पिपरखेड टोलनाक्याजवल भीषण अपघातात पती -पत्नी ठार
तर दुचाकीस्वार व कार चालक जखमी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.३० नांदगांव -चाळीसगाव रस्त्यावर गुरुवारी ता.३० रोजी
दुपारी २ वाजे च्या सुमारास कार व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला यात दुचाकी स्वार पती पत्नी ठार झाले दोन जखमी झाले आहे
गुरुवारी दुपारच्या सुमारास पिंपरखेड शिवार टोलनाक्या जवळ इको कार MH 20 G K 6457 व मोटरसायकल MH 15 B R 7085 यांचा अपघात झाला असून असून यात मोटरसायकल स्वार भाऊसाहेब बंडू माळी (वय 45 वर्ष ) व मंगलबाई भाऊसाहेब माळी ( वय 40 वर्ष ) रा पिंपराळे ता.नांदगांव हे पती – पत्नी मयत झाले असून त्यांचा मुलगा मोटरसायकल चालक अमोल भाऊसाहेब माळी (वय 25 ) वर्ष राहणार पिंपराळे तालुका नांदगाव हा व कार चालक राजेंद्र प्रतापसिंग परदेशी हे दोघे जखमी झाले आहे अपघातात जखमी मोटरसायकल चालक व कार चालक यांना उपचारासाठी मालेगाव हलविण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच नांदगांव चे सहायक पोलीस निरीक्षक सुनील बढे हे अपघात स्थळी दाखल होत जखमींना मदत कार्य करत उपचारासाठी हलविले सदर अपघाताचा तपास नांदगांव चे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे करीत आहे