
गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.०७ आतापर्यंत आपण सर्वांनी ऐकले होते कि ज्ञानदान सर्वात श्रेष्ठदान आहे याची प्रचिती नांदगाव तालुक्यात आली आहे इयत्ता 4 थी शिकत असलेल्या चिमुकली आराध्या अर्चना धवलचंद्र आढाव या विद्यार्थीने चक्क आपल्या जन्म दिनानिमित आमदार सुहास कांदे यांच्या गुरुकुल, तंत्रनिकेतन,औद्योगिक कॉलेजला मातृभाषेतून इंग्रजीकडे ज्ञान दान करुन आपला जन्म दिवस या कॉलेजच्या विद्यार्थी सोबत साजरा केला…
या वेगळ्या प्रकारचा संदेश समाजात देण्याचे काम या 4 थी शिकत असलेल्या आराध्या आढावने केले.त्याबदल सर्वत्र आराध्यासह तीच्या पालकांचे अभिनंदन होत आहे.आमदार सुहास कांदे,नांदगांव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉ आंनद पारख,शामभाउ पारख,महावीर पारख, महावीर सुराणा,दिलीप पारख,शांतीलाल सुराणा राजेन्द्र लोढ़ा,माजी नगराध्यक्ष चेतन पाटिल,हिंदू पंच कमिटीचे पदाधिकारी ,पत्रकार अनिल धामणे यांनी अभिनंदन केले.कर्ण हे पात्र आजही दानवीर म्हणुन ओळखले जाते.कुणी श्रमदान करते,कुणी रक्तदान,कुणी अन्नदान,कुणी संपत्ती दान करते,कुणी गो दान करते,कुणी अवयव दान करते,कुणी वस्त्रदान करते कुणी सुवर्ण दान तर कुणी कन्यादान करते.परंतु जे.टी. के.इंग्लिश मीडियम स्कूल येथील इयत्ता 4 थी मध्ये शिकणारी चिमुकली कुमारी आराध्या अर्चना धवलचंद्र आढाव हिने आपला प्रगटदिन ज्ञानदानाने साजरा केला.कुणी म्हणेल हे कसले दान? पण आराध्या ने गुरुकुल तंत्रनिकेतन आणि गुरुकुल आयटीआय नांदगाव येथील विद्यार्थ्यांना मातृभाषेतून इंग्रजीकडे या आशयाने इंग्रजी शिकवून ज्ञान दान केले. यावेळेस गुरुकुल तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रो झाडखंडे,आयटीआय चे प्राचार्य प्रो थेटे तसेच समस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री डी.एस.क्षीरसागर सर यानी केले