ताज्या घडामोडी

बाणगाव बुद्रुकला महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

श्री क्षेत्र बाणेश्वर भगवान मंदिरात भाविकांचा हर हर महादेवचा जयघोष

फोटो ओळ बाणगाव : श्रीक्षेत्र बाणेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेण्यासाठी लागलेली भाविकांची रांग. ( छाया – बाबासाहेब कदम बाणगाव )
गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज : वृत्तसेवा
बाबासाहेब कदम
नांदगाव ता. २१ :नांदगांव तालुक्यातील बाणगांव येथीेल प्रसिद्ध श्री क्षेत्र बाणेश्वर भगवान मंदिरात सालाबादा प्रमाणे महाशिवरात्र सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
सकाळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे व माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभाताई कवडे व नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे यांनी सपत्नीक अभिषेक व महाआरती केली.रात्री बारापासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.सकाळी नऊला श्री बाणेश्वर भगवान मूर्तीची गावातून मिरवणूक काढण्यात आली.श्री बाणेश्वर मंदिराच्या प्रांगणात पंचक्रोशीतील नांदगाव, दहेगाव,तांदूळवाडी,टाकळी, खिर्डी,भौरी,मोरझर,वडाळी,भालूर, सोयगाव,मोहेगाव या गावांतील पायी दिंड्या एकत्र आल्या. त्यानंतर ह.भ.प रामकृष्ण महाराज बाणगावकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला.रामकृष्ण महाराज यांनी उपस्थित भविकांना भगवान महादेवाचे महात्म विशद केले महादेवाचे स्वरूप बद्दल व महाशिवरात्र बद्दल विस्तृत अशी माहिती विशद केली व श्री क्षेत्र बाणेश्वरची महंती विशद केली.
.नांदगाव- बाणगाव रोडवर भाविकांसाठी फराळ व फळे, ज्यूस वाटप विविध स्टॉलद्वारे वाटप केले गेले.श्री क्षेत्र बाणेश्वराचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील लहान मुले,महिला पायी आले व नांदगांव बसआगरा तर्फे यात्रासाठी बसची व्यवस्था केली गेली संपुर्ण दिवसभर मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी मोठी रिघ लागली होती. मंदिर परिसरात यात्रा मध्ये खरेदी करण्या साठी लहान मुले व महिलांनी गजबजलेली होती रात्री ११ वाजता उत्तर पुजा करण्यात आली रात्री बारांवाजे पर्यन्त भाविक दर्शन घेण्यासाठी येत होते.यात्रा यशस्वी होण्यासाठी जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावतील ग्रामपंचायतचे सरपंच संगिता बागुल,उपसरपंच वैशाली कवडे ग्रामसेवक युवराज निकम व ग्रा.प सदस्य व तरुणानी नियोजन केले.भाविकाना दर्शन सुलभ होण्यासाठी गावातील तरुण स्वयंसेवकानी मेहनत घेतली पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भूषण आहिरे पोलीस नाईक सागर कुमावत,पोलीस कॉन्स्टेबल दीपक मुंडे,महिला पोलीस,श्रीमती संध्या कोकाटे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला

.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.