ताज्या घडामोडी
Trending

लिटल स्टार व रेनबो इंटरनॅशनल स्कुल मध्ये सोलो डान्स स्पर्धेत विद्यार्थ्यांकडून नृत्य सादर,

स्कुलच्या ११० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

,
गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा

नांदगाव ता.२२ नांदगाव येथील नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूलची सोलो डान्स स्पर्धा यशस्वीरित्या घेण्यात आली .          विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल, उपाध्यक्ष सरिता बागुल,लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका खांडेकर,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व पर्यवेक्षक म्हणून शिवानी गांधी काम पाहिले.त्यांनी आपल्या नृत्य सादरीकरणातून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
 या स्पर्धेमध्ये एकूण ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये एका विशिष्ट प्रकारचे नियमावली ठरवण्यात आलेली होती.विद्यार्थ्यांना एका मर्यादित वेळेत आपले नृत्य सादर करावयाचे होते.यामध्ये विद्यार्थ्यांचे वयोगटाुसार ग्रुप तयार करण्यात आलेले होते .या ग्रुपला अनुक्रमे ग्रुप ए,ग्रुप बी ग्रुप सी,ग्रुप डी ही नावे देण्यात आलेली होती.यामध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात आले आणि प्रत्येक ग्रुप मधून विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून विद्यार्थ्यांना बक्षीसे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमात पालकांनी प्रेक्षक म्हणून उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.या स्पर्धेचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका पिलके व नेहा यांनी केले.
या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल,उपाध्यक्ष सरिता बागुल यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले.ही स्पर्धा उत्तमरीत्या घडवून आणण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतोनात मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.