ताज्या घडामोडी

नांदगावला ‘आप’चे तहसीलदारांना निवेदन

आम आदमी पार्टीतर्फे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.०२ : येथील आम आदमी पार्टीतर्फे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ तहसीलदार चे डॉ सिद्धार्थकुमार मोरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदविण्यात आला. निवेदनात,केंद्रातील भाजप सरकार हे सूड भावनेने राजकारण करीत आहे.आम आदमी पार्टी देशभरात चांगले काम करत आहे. येणाऱ्या काही दिवसांत आम आदमी पार्टी भाजप सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे नमूद केले आहे.यावेळी
जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडघुले शहरप्रमुख प्रमोद पगारे,ज्येष्ठनेते खालकर,अंबादास मोरे,भारत सांगळे,विकी कदम,सोमनाथ मगर, संतोष काकळीज,विकास गवळी,प्रशांत दैतकार आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.