ताज्या घडामोडी
Trending

नांदगाव बाजार समिती निवडणूकित सत्ताधाऱ्यांना पतंग तर विरोधकांना छत्री चिन्ह

१८ जागेसाठी चाळीस उमेदवार रिंगणात

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा

नांदगाव,ता २१ सात वर्षांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख सुहास कांदे जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या नेतृत्वाखालील शिवनेरी शेतकरी पॅनल ने तेव्हाच्या निवडणुकीत अठरा पैकी पंधरा जागा जिंकून विजय संपादन केला होता हा विजय पतंग निशाणीवर मिळाला होता आता सध्या होत असलेल्या यंदाच्या निवडणुकीतही पतंग निशाणी कायम ठेवत फक्त पॅनेलच्या नावात बदल करीत ते आता छत्रपती शिवाजी महाराज पॅनल असे करण्यात आले एवढाच काहीसा बदल कांदे-कवडे गटाने केला.
गेल्या निवडणुकीत तत्कालीन आमदार पंकज भुजबळ माजी आमदार अँड अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखालील किसान विकास पॅनेलने व्यापारी हमाल मापारी गटातील तीन जागांवर विजय मिळाला होता तेव्हा सत्तारूढ असलेल्या आहेर-भुजबळ गटाने गेल्या निवडणुकीत कपबशी निशाणी घेतली होती यंदाच्या निवडणुकीतआता कपबशी ऐवजी छत्री निशाणी हा बदल दिसत आहे
गेल्या निवडणुकीत आहेर-भुजबळ गटाकडून विजयी झालेले मावळते संचालक यज्ञेश कलंत्री,भास्कर कासार आमदार सुहास कांदे यांच्याकडून लढवीत आहे विलास आहेर हे गेल्या वेळेस आहेर-भुजबळ गटाकडून प्रक्रिया गटातून बाजार समितीवर संचालक झाले होते ते यंदाच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या पुरस्कृत पँनेलच्या प्रमुख सूत्रधारांपैकी एक बनले आहेत तर गेल्या निवडणुकीत आहेर-भुजबळ गटाकडून निवडणूक लढविणाऱ्या समाधान पाटील,कैलास पाटील हे यंदाच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या पॅनेलमधून नशीब अजमावीत आहेत तर मावळत्या संचालक मंडळातील एकनाथ सदगीर,अलकाताई कवडे,मंगलाताई काकळीज,यांना आमदार सुहास कांदे,जेष्ठ बापूसाहेब कवडे यांच्याकडून फेर उमेदवारी देत पुन्हा संधी देण्यात आली अन्य उमेदवारांत दोन ठिकाणी निवडणूक लढविणाऱ्या भाऊसाहेब सोनवणे यांना सोसायटी सर्वसाधारण गटात रोड रोलर तर ग्रामपंचायत गटात गॅस सिलेंडर निशाणी मिळाली मापारी गटात उभे असलेल्या निलेश इप्पर याना विमान तर ढेकू येथील संतोष राठोड याना ग्रामपंचायत गटात तलवार निशाणी मिळाली आहे व्यापारी गटात गोकुळ कोठारी यांना कपबशी तर संजय सानप यांना बस निशाणी देण्यात आली

***********
★★ पॅनेलनिहाय उमेदवारांची नावे ★★
आमदार सुहास कांदे,जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या नेतृत्वाखालील पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पँनेल(चिन्ह पतंग ) मधील उमेदवार ग्रामपंचायत गट अनिल वाघ अर्जुन पाटील दिपक मोरे अनिल सोनवणे सोसायटी महिला गटात मंगला काकळीज अलका कवडे तर विजाभज मधून पोपट सानप ओबीसी मधून विलास आहेर तर सोसायटी सर्वसाधारण एकनाथ सदगीर कैलास पाटील समाधान पाटील विजय इप्पर,साहेबराव पगार जीवन गरुड,सतीश बोरसे व्यापारी गटातून यज्ञेश कलंत्री अमोल नावंदर तर हमाल मापारी गटात भास्कर कासार…

●●●●●●
माजी आमदार अँड अनिल आहेर,पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनल चे उमेदवार पुढीलप्रमाणे सोसायटी सर्वसाधारण गट दिलीप नंद शिवाजी वाघ धोंडीराम काळे दर्शन आहेर हरेश्वर सुर्वे विजय इप्पर समाधान बोगीर अमित नहार महिला गटातून चंद्रभागा वाबळे बेबीताईपगार इतर मागास वर्ग गटातून मविप्रचे संचालक अमित बोरसे विमुक्त जाती भटक्या जमाती जागेतून अँड सुरेश आव्हाड ग्रामपंचायत सर्वसाधारण दीपक खैरनार उदय पवार ग्रामपंचायत अनुसूची जाती जमाती अशोक जाधव आर्थिक दुर्बल गटातून विजय पाटील चव्हाण व्यापारी गटातून मुकुंद खैरनार

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.