जय हरी विठ्ठलाच्या गजरात आदर्शच्या चिमुरड्यांनी काढली दिंडी

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा
नांदगाव,ता २९ आषाढी एकादशी च्या आज पूर्व संध्येला जय हरी विठ्ठलाच्या गजरात येथील मविप्र संचालित आदर्श प्राथमिक शाळा आणि आदर्श शिशुविहार च्या चिमुरड्यांनी काढलेल्या दिंडीने सगळ्या चे लक्ष वेधून घेतले ताळ -मृदंग घेतलेल्या शाळेतून निघालेल्या विठ्ठल-रख्मिणी, ज्ञानेश्वर, सोपान, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई यांची पारंपारिक वेशभूषेतील दिंडीतल्या या चिमुरड्या वारकऱ्यांच्या जयघोषाने जवळच असलेल्या हनुमाननगर मधील पालकांसह रहिवाश्यांची मने जिंकली या दिंडीसोबत विठ्ठल रुख्माई ची मूर्ती ठेवलेल्या पालखीचे हनुमान नगर मधील भाविक महिला भगिनींनी मनोभावे पूजा करीत दर्शन घेतले शेवटी न्यू इंग्लिश स्कुलच्या प्रागंणात वेगवेगळे भजने सादर करीत गोल रिंगण करीत सांगता करण्यात आली स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाराम गवांदे वसंतराव गांगुर्डे,विजय काकळीज आदींनी हनुमाननगर जवळ या दिंडीचे स्वागत केले तर सौ मंदाकिनी गवांदे यांनी पालखी पूजन केले मुख्याध्यापक कारभारी तांदळे.संजय जाधव प्रदीप शिरसाट रवींद्र कदम सतीश चव्हाण शरद आहेर सुभाष पवार,शितल तासकर,आशा बागुल,कल्पनाअहिरे,मंगला जाधव,निशिगंधा कदम,जयश्री पाटील,योगिता खरोटे,माधवी देवकर.यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद या दिंडीत सहभागी झाले होते
नांदगाव:- येथील मविप्र संचालित आदर्श प्राथमिक शाळा आणि आदर्श शिशुविहार च्या चिमुरड्यांनी काढलेल्या दिंडीतल्या पालखीचे पूजन करतांना सौ मंदाकिनी गवांदे सोबत स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाराम गवांदे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी