आरोग्य व शिक्षण

नांदगाव तालुक्यात जि. प शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा

दोनशे वर शिक्षकांची पदे रिक्त, पदे भरण्याची मागणी

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा
बाबासाहेब कदम
बाणगाव बुद्रुक ता.१४ नांदगांव तालुक्यात एकून २११ जि प च्या प्राथमिक शाळा आहेत.या शाळांना ७६५ पदांची,तथा शिक्षांची व अधिकारी यांची गरज असतांना सध्या तालुक्यात ५४३ पदावर शिक्षक कार्यरत आहेत यात २२२ पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून,वरिष्ठांनी दखल घेऊन त्वरित तालुक्यातील रिक्त जागा भराव्या, अशी मागणी पालकांकडून होत आहे
शिक्षकांच्या रिक्त पदामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणावर विपरीत परीनाम होत आहे.नांदगांव तालुक्यातील.सन २०२३ या वर्षात ११२ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत या बदली प्रक्रियेत तालुक्यांत फक्त ६१ शिक्षक मिळाले आता शाळा सुरु झाल्या शिक्षकांचा तुटवडा असल्याने प्राथमिक शालेय विद्यार्थ्यावर त्याचे परिणाम होत आहे शिक्षक नसल्याची ओरड गावागावतील शाळेतुन होत आहे जिल्हा परिषद शाळामध्ये प्राथमिक शिक्षण घेणारी मुले,मुली हि फक्त गरीब आणी आदीवासी कुटुंबातील आहेत.त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे कोणी लक्ष.द्यायला कोणी तयार नाही अशी भावना पालकांच्या वतीने व्यक्त होत आहे
शिक्षक संघटनेने गटविकास अधिकार्यांना निवेदन सादर करुन अपुरे शिक्षक पूर्ण करण्याची मागणी केली आहे एका गुरुजींना दोन पेक्षा जास्त वर्ग संभाळावे लागतात तेव्हा विद्यार्थ्यांची गरज पूर्ण कशी होणार? गत तिन वर्षापासून तालुक्यात शिक्षक अपूर्ण आवस्थेत आहेत त्याचा बोजा इतर गुरुजीवर पडत आहे यावर शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी सातत्याने होत आहे पण ती गरज काही केल्याने पूर्ण होत नाही.राज्य शासनाकडुन गुवत्ता वाढीचे धडे गिरवले जात आहे पण ग्रामीण भागातील विद्यार्थी अपुर्या शिक्षणावर वेळ काढत आहे.पण रिक्त जागांची पोकळी भरुन काढण्यासाठी शासन पावले उचले जात नसल्याचे चित्र दिसत आहे

*********

राज्य सरकारने राज्यातील शिक्षक भरतीवर २०११ पासून बंदी घातली होती.ही बंदी २०१९ मध्ये उठली आहे.परंतु बंदी उठून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही.बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक ३०विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे अनिवार्य आहे.शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार याकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष दिले.तरच ग्रामीण भागातील शाळा टिकतील

दृष्टिक्षेप…
नांदगांव तालुक्यात गटशिक्षण अधिकारी १ पद आहे ते देखील रिक्त आहे.सध्या प्रभारी कारभार चालु आहे.शिक्षण विस्तार अधिकारी ६ पदे मंजूर आहेत पैकी ४ रिक्त आहे,२ कार्यरत आहेत.केंद्र प्रमुख १३ पदे आहे हे सर्व रिक्त आहे.मुख्याध्यापक ३५ पदे आहेत पैकी १४ कार्यरत असून २१ पदे रिक्त आहे.पदवीधर शिक्षक ८५ पदे आहेर पैकी ३० कार्यरत असून ५५ पदे रिक्त आहेत.उपशिक्षक ६२४ पदे आहेत पैकी ४९७ कार्यरत असून १२७ पदे रिक्त आहे.वरिष्ठ सहाय्यक १ पद आहे ते देखील रिक्त आहे .

★★★★★
नांदगाव तालुक्यात शिक्षकांची व पर्यवेक्षीय यंत्रणेची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत.शासनाने सदर पदे लवकरात लवकर भरावीत म्हणजे अधिक गुणवत्तापुर्ण शिक्षणाचे काम करता येईल व ग्रामस्थांच्या तक्रारीही दुर होतील.शिक्षण विभागाची जे अधिकारी कर्मचारी उपलब्ध आहे त्यांच्यावर शिक्षणाचे नियोजन चालू आहे.रिक्त पदे भरली गेली तर शैक्षणीक गुणवत्तेत वाढ होईल.

प्रमोदर चिंचोले,:- प्रभारी गटशिक्षण अधिकारी नांदगांव प स

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.