ताज्या घडामोडी

आपले आशीर्वाद हाच माझा सत्कार ;आमदार सुहासआण्णा कांदे

आमदार सुहास कांदेच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चाने लोकोपयोगी सुविधांचे लोकार्पण

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता.०७ आपला आशीर्वाद हाच माझा मोठा सत्कार असून, मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठीचे पाठबळ सदैव माझ्या पाठीशी असेच असू द्या,दुष्काळात शासकीय पातळीवर उपाययोजना होतच राहतील.,दुष्काळाच्या परिस्थितीत मतदारसंघात नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात मी सर्वात पुढे असेल,अशी भावना आमदार सुहासआण्णा कांदे यांनी बुधवारी (ता.६) आपल्या वाढदिवसानिमित्त निवासस्थानी व गुप्ता लॉन्स येथे आयोजित लोकोपयोगी सुविधांचा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते

आमदार सुहास आण्णा कांदे यांना अभीष्टचिंतन करण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून आलेल्या त्यांच्या समर्थक यांनी एकच गर्दी केली होती.तालुक्यासह संपूर्ण मतदार संघावर दुष्काळाचे भीषण असे सावट घोंघावत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास आण्णा कांदे यांनी कुठल्याही प्रकारचे हारतुरे न स्वीकारता आपला वाढदिवस साध्या पध्द्तीने साजरा करतं त्यांनी आपल्या वैयक्तिक खर्चातून पिण्याच्या पाण्याची वाहतूक करणारे जलरथ,वैद्यकीय सुविधांनी परिपूर्ण अशा तीन नव्या रुग्णवाहिका,दिव्यांग बांधवासाठी शंभर सायकली,मोतीबिंदूची शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र बस, वैकुंठ रथ आदी विविध लोकोपयोगी सुविधांचे लोकर्पण केले.

याप्रसंगी साकोरी येथील 50 जेष्ठ नागरिकांना आमदारांच्या हस्ते निराधार योजनेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची
६ सप्टेंबर ला पुण्यतिथी असल्याने आमदार सुहासआण्णा कांदे,समाजसेविका अंजुमताई कांदे यांनी प्रतिमापूजन करीत माँ साहेबांना अभिवादन केले.यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे,अल्ताफ बाबा खान,शिवसेना युवासेना,फरहान खान,माजी सभापती तेज कवडे,माजी आमदार राजाभाऊ देशमुख,केदा नाना आहेर,डॉ आत्माराम कुंभार्डे,रिपाइंचे नेते राजाभाऊ अहिरे,माजी नगराध्यक्ष काळू शिंदे,अड सचिन साळवे, कातकडे,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,साईनाथ गिडगे,राजाभाऊ पवार,विलास आहेर, आबा इनामदार,रमेश बोरसे,माजी सभापती सुभाष कुटे,सभापती अर्जुन पाटील,अनिल रिंढे,बाळ काका कलंत्री,दिलीप इनामदार,अॅड. युनूस शेख,महावीर पारख,बबलू पाटील,प्रकाश घुगे,सतीश पाटील,राजेंद्र पवार,मयूर बोरसे,सुनील हांडगे,विष्णू निकम,एकनाथ सदगीर,भाजप व्यापारी सेलचे दत्तराज छाजेड,पंकज खताळ,महेंद्र दुकले,संग्राम बच्छाव,एन.के राठोड,राकेश ललवाणी,अमजद पठाण, देवीदास मोरे,गोकुळ कोठारी,आबा देवरे, माजी नगरसेवक किरण देवरे,जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष प्रमोद भाबड,अमोल नावंदर,नंदू पाटील,डॉ.सुनील तुसे,राजाभाऊ देशमुख,संजय आहेर,बाळासाहेब आव्हाड,किशोर लहाने,अंकुश कातकडे,सुनील जाधव, भावराव बागूल,कैलास भाबड अशोक डगळे,समाधान पाटील,चेतन पाटील,साहेब उत्तम व्हडगळ,कपिल तेलुरे महिला आघाडी पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.