महाराष्ट्र

मनमाड – नांदगाव रस्त्यावर हिसवळ गावाजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता .२१ मनमाड – नांदगाव रस्त्यावर हिसवळ गावाजवळ मोटार सायकल व चार चाकी वाहन यांच्यात अपघातात दुचाकीस्वार पाझनदेव येथील माध्यमिक शिक्षक प्रशांत माणिक ठाकरे यांचा मृत्यू

हिसवळ येथील रहिवासी व व पाझनदेव येथे माध्यमिक विद्यालयात कार्यरत शिक्षक प्रशांत माणिक ठाकरे (वय ३८) हे शुक्रवारी (ता.२९) रोजी सकाळी ८ते ९ वाजेच्या दरम्यान जोधळवाडी येथून नांदगावच्या दिशेने येत असताना हिसवळ गावाजवळील पुलाजवळ मनमाड च्या दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने या भीषण अपघातात दुचाकीस्वार प्रशांत माणिक ठाकरे (वय ३८) यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे,प्रशांत ठाकरे हे पाझनदेव येथील शिक्षण संस्थेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांच्या अपघाती निधनामुळे पाझनदेव व हिसवळ गावात शोककळा पसरली आहे

फोटो ओळ
१) अपघातात ठार माणिक बोरसे यांचा फोटो
२) अपघातग्रस्त दुचाकी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.