आपला जिल्हामहाराष्ट्र

नांदगावला लाडक्या बाप्पाला धुमधडाक्यात निरोप;

विसर्जनासाठी पालिकेकडून कुंड व ,निर्माल्य संकलन

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता ३० गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..च्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला गणपत्ती बाप्पा चा जयजयकार करीत अंगावर गुलाल घेत या मिरवणुका रात्री उशिरा पर्यंत सुरु होत्या.

दुष्काळाच्या पार्श्ववभूमीवर यंदा लाडक्या बाप्पाला निरोप देताना मन्याड नदी, कासारी घाटातील चांदेश्वरी नदी जवळ यंदा गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्याकडे कल दिसून आला

शिवाय श्री मूर्तीचे संकलन,निर्माल्य संकलन कामी नांदगाव नगर पालिकेच्या वतीने “देव घ्या देवपण घ्या” या उपक्रमाला नांदगावकरांनी भरभरून प्रतिसाद दिला उत्सवाचे पावित्र्य जपण्यासोबत पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या निर्माल्य केंद्रात भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला शिवस्फूर्ती चौकात श्री गणेशमूर्ती कृत्रिम विसर्जन तलाव तसेच छत्रपती संभाजीनगर रोड, येवला रोड आणि जैन धर्मशाळा या ठिकाणी मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र तयार करण्यात आले होते. सदरील उपक्रमा अंतर्गत जवळपास 400 मूर्ती व 150 किलो निर्माल्य संकलन झालेले आहे.

सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी श्री विवेक धांडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे,आरोग्य निरीक्षक राहुल कुटे, विजय कायस्थ,अरुण निकम, रामकृष्ण चोपडे,अंबादास सानप,दीपक वाघमारे, सुनील पवार, निलेश देवकर,आकाश जाधव,गौरव चुंबळे,देविदास साबळे,वाल्मिक गोसावी,शंकर शिंदे,गायकवाड,कोटमे,कटारे,चांडाले,पाटील,गुढेकर, भालेकर इत्यादी कर्मचारी यांनी परिश्रम केले.

फोटो ओळी
माणिकपुंज :- सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्ववभूमीवर माणिकपुंज धरणाच्या परिसरात लाडक्या श्री च्या मूर्तींचे विसर्जन करताना युवक व युवती-महिलांचे मंडळे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.