ताज्या घडामोडी

गारपीट,आवकळी च्या नुकसानभरपाई मिळण्यासाठी मांडवडच्या शेतकऱ्यांचे उपोषण

गर्जा महाराष्ट्र24 वृत्तसेवा

नांदगाव ता. ०३ तालुक्यातील मांडवड व आझाद नगर येथे मार्च व एप्रिल च्या महिन्यात अतिवृष्टीमुळे व गारपीटच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वारंवार निवेदनात द्वारे मागणी करूनही नुकसानभरपाई न मिळाल्याने अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठलआबा आहेर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मंगळवारी ता.०३ रोजी मांडवड ग्रामपंचायतिच्या कार्यालयाजवळ उपोषन सुरू केले असून जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धार उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी केला आहे.

तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार गारपीट नुकसानभरपाई अनुदान विंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अतिवृष्टी आणि गारपीट होऊन सहा सात महीने उलटून देखील मागणीकडे दखल घेत नाही, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनात च्या माध्यमातून वेळोवेळी मागणी करत आहे मात्र आम्हाला नेहमीच आठ दिवसाचा कालावधी देऊन वेळ मारुन नेण्यात येत आहे त्यामुळे आम्हाला आता उपोषणा शिवाय पर्याय च नव्हता संबंधित कार्यालयाच्या वतीने जोपर्यं तोपर्यंत आम्हास ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा निर्धार उपोषण कर्त्या शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे,सदर उपोषणास माजी आमदार मनमाड मार्केट कमिटीचे सभापती श्री संजय पवार यांनी भेट दिली

उपोषणस्थळी तहसीलदार डॉ सिध्दार्थ कुमार मोरे गटविकास अधिकारी गणेश चौधरी,कृषी अधिकारी यांनी जात उपोषणकर्ते शेतकऱ्यांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली जोपर्यंत अनुदान मिळण्याची कार्यवाही चे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच असल्याचा निर्धार उपोषण कर्त्या शेतकऱ्यांनी करत उपोषण सुरू ठेवल्याचे समजते

विठ्ठल आबा आहेर,अशोक निकम,उमाकांत थेटे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुशील आंबेकर,दत्तात्रय निकम अनंतभैय्या आहेर,सरपंच अंकुश डोळे,गंगाराम थेटे,महेश मोहिते सिताराम पिंगळे सागर गडाख विजय आहेर शंकरराव थेटे वाल्मीक थेटे माजी सरपंच बाळासाहेब आहेर संजय निकम सोमनाथ नाझरकर सुबोध थेटे प्रमोद कदम माधवराव गडाख रमेश आहेर रामसिंग पिंगळे सुशिल आंबेकर, दत्तात्रय थेटे, बंडु थेटे, शरद काजळे, आण्णा दुलचंद आहेर, दिपक गडाख,बाबासाहेब आहेर,दिपक साळुंखे, इत्यादी ग्रामस्थ बसले आहे

प्रतिक्रिया

या कामी कर्मचारी नेमणूक केले असून शेतकऱ्यांचे आधार व्हेरिफिकेशन करायचे काम सुरू आहे आधार व्हेरिफिकेशन करून अपलोड करून त्यांना मदत देता येईल डॉ सिध्दार्थ कुमार मोरे – तहसीलदार नांदगाव

*******

गारपीट मुळे नुकसानीचे पंचनामे करण्याऱ्या चार कर्मचारी पैकी एक कर्मचारी यांनी याद्या तयार करून ५०२ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले पण उर्वरित तीन कर्मचाऱ्यांनी पंचनामे करून याद्या न टाकल्याने आम्हास अनुदानापासून वंचीत राहावे लागले या संदर्भात वेळेवेळी निवेदन दिली संबंधित कार्यालयातने वेळ मागून घेतली पण अनुदान काही मिळाले नाही आम्हास नाईविलाज वास्तव उपोषणाला बसावे लागले आहे..

विठ्ठल आबा आहेर – उपोषणकर्ते शेतकरी

फोटो ओळ –

मांडवड येथील गारपीट, आवकळी च्या नुकसानभरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे सूर असलेल्या उपोषणस्थळी शेतकऱ्यांशी चर्चा करताना तहसीलदार डॉ सिध्दार्थ कुमार मोरे,गटविकास अधिकारी गणेश चौधरी समवेत माजी आमदार संजय पवार, विठ्ठलआबा आहेर आदी.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.