ताज्या घडामोडी

घरकुलांसाठी नांदगावात वंचीत लाभार्थीचें झोपडी आंदोलन

तहसील आवारातच ठोकल्या झोपड्या; गरजूंना यादीत प्राधान्य देण्याचे आश्वासन

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव, ता. ०४ प्रधानमंत्री आवास योजना ‘ड’ यादीतील विशेष गरजू लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने लाभ मिळवा, यासह विविध मागण्यांसाठी येथील तालुका पंचायत समिती कार्यालयाबाहेर झोपड्या ठोकत मंगळवारी (ता. ३) प्रहार संघटनेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले.घरकुल योजनेत गरजूंना प्राधान्यक्रम मिळावा,या मागणीसाठी हे आंदोलन आले.

गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत गरजू, पात्र लाभार्थीची प्राधान्याक्रमानुसार यादी तयार करून त्यास ग्रामसभेची मंजुरी घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनाच्या “ड” यादीमध्ये एकूण १५,६९९ पात्र लाभार्थी असून पात्र लाभार्थ्यामध्ये विशेष गरजू लाभार्थी देखील आहेत.त्यांना इतर लाभार्थ्यापेक्षा प्राधान्यक्रमाने घरकुल योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे असे गरजू लाभार्थी त्यांना लाभ न मिळाल्याने ते कुटुंबासह उघडयावर राहत आहेत.
ग्रामपंचायतस्तरावरून मात्र शिफारस करण्यात आलेल्यापात्र लाभार्थ्यांची यादी कुठल्याही प्राधान्यक्रमाचा विचार न करता जशीच्या तशी पाठविण्यात येत असते. त्यात विशेष गरजू लाभार्थीना लाभ मिळण्यास विलंब होत असतो त्यामुळे या लाभार्थ्यांना ‘ड’ यादीत दुसऱ्या टप्यामध्ये प्राध्यान्यक्रमाने घरकुल योजनेचा लाभ मिळावा. यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात प्रहार संघटनेचे चंद्रभान झाडगे, संदीप सूर्यवंशी, किरण गवळी, गणेश चव्हाण, संतोष राठोड, काळीबाई चव्हाण, गोरख जगन्नाथ, प्रकाश चव्हाण, धर्मा मोरे, किशोर राठोड, किरण चव्हाण, जगन चव्हाण, दिनकर पवार,बंडू चव्हाण, जनार्दन भागवत, धर्मा राठोड, रामलिंग हिंगमिरे, प्रकाश चव्हाण, संदीप पाटील, आनंदा सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते.

नांदगाव: प्रहार संघटनेतर्फे करण्यात आलेल्या झोपडी आंदोलनात लाभार्थीना लेखी आश्वासन देताना गटविकास अधिकारी गणेश चौधरी. शेजारी चंद्रभान झाडगे, संदीप सूर्यवंशी, किरण गवळी, गणेश चव्हाण, संतोष राठोड, काळीबाई चव्हाण, गोरख जगन्नाथ आदी.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.