ताज्या घडामोडी

मांडवडच्या शेतकऱ्यांचे उपोषण तिसऱ्या दिवशी ही सुरू

गर्जा महाराष्ट्र24न्यूजवृतसेवा

नांदगांव ता.०५ : मांडवड येथे मार्च- – एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनेकवेळा मागणी करून ही नुकसान भरपाई न मिळाल्याने मंगळवार (ता ३) पासून संतप्त • शेतकऱ्यांनी सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी गुरुवारी ही सुरू होते


दरम्यान उपोषणस्थळी तहसीलदार डॉ सिध्दार्थ कुमार मोरे,गटविकास अधिकारी गणेश चौधरी व तालुका कृषी अधिकारी यांनी उपोषणार्थीची भेट घेऊन चर्चा केली होती व तात्काळ पंचनामा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ खाली पत्र देऊन सदर शेतकऱ्यांचे पंचनामे केलेली परिपूर्ण यादी तहसील कार्यालयास सादर करण्याचे आदेश होते.उपोषणकर्ते शेतकऱ्यांच्या मागणी नुसार गारपीट व आवकळी पावसाच्या पंचनाम्या प्रमाणे अनुदान बाधित शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत कार्यवाही चालू असून गुरुवारी काही शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून मांडवला पाठविण्यात आल्या आहे असून उरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण करण्याचे काम सुरू असलेल्या चे पत्र तहसीलदारांनी उपोषणकर्ते शेतकऱ्यांना गुरुवारी दिले यावर उपोषणकर्ते यांचे समाधान न झाल्याने उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवलेचे कळविले आहे


SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.