ताज्या घडामोडी

मनमाडला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे भूमिपूजन संपन्न .

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

मनमाड ता.०५ आमदार सुहास अण्णा कांदे यांची महत्त्वकांक्षी पाणी योजना असणाऱ्या, हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड पाणीपुरवठा योजने अंतर्गत येणाऱ्या शहरातील तीन जलकुंभा पैकी आज संकलेच्या हिरो शोरूम पाठीमागील जलकुंभाचे (क्षमता 3.85 लक्ष ली.) भूमिपूजन करण्यात आले.
I


या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी माजी आमदार राजाभाऊ देशमुख हे होते.प्रास्ताविक मुख्याधिकारी श्री.चौधरी यांनी केले.या वेळी त्यांनी सद्य परिस्थिती सांगत करंजवण धरणातील जॅकवेल चे काम 80% पूर्णत्वाकडे असल्याचे सांगितले,मनमाड शहरालगत सुरू असलेले केंद्राचे काम 80 टक्के पूर्ण झाले असल्याचे सांगितले,तसेच जवळपास 60 किलोमीटर पाईपलाईन टाकून झाले आहेत व मनमाड शहरात तीन जलकुंभ निर्मितीचे काम लवकरच सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.

माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांनी यावेळी बोलताना योजनेचे काम ज्या वेगाने सुरू आहे ते पाहता योजना मनमाड शहराकडे चालत नाही तर पळत येत आहे असे म्हणत आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. युवा सेना जिल्हाप्रमुख पफरहान दादा खान यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास अण्णा कांदे यांचे खरे पाठबळ आपण जनता आहे याबद्दल आभार मानले.

या वेळी युवासेना मुख्याधिकारी मनमाड नगर परिषद श्री.शेषराव चौधरी साहेब,जिल्हा प्रमुख फरहान दादा खान,उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे,शहर प्रमुख मयूर बोरसे,अल्ताफ बाबा खान, राजाभाऊ भाबड,आर पी आय जिल्हाप्रमुख राजाभाऊ अहिरे, युवासेना शहर प्रमुख योगेश इमले,नितीन पांडे,दिलीप तेजवानी, गांगाभाऊ त्रिभुवन,असलम खान,नाना शिंदे,वाल्मीक आंधळे, अमिन पटेल, रवींद्र घोडेस्वार,गालिब शेख,महेंद्र शिरसाठ,राकेश ललवाणी, एजाज शाह,अमजद पठाण, प्रमोद अहिरे,दिनेश घुगे,संतोष अहीरे, अजीज शेख,लाला नागरे,संजय दराडे,मुकुंद झाल्टे,जलील भाई अन्सारी सुभाष माळवतकर,बाबा पठाण,सुनील ताठे,लोकेश साबळे,विशाल सुरावसे,समीर पटेल,मिलिंद उबाळे,मन्नू शेख,ललित रसाळ,संदीप पाटील,पिंटू वाघ,दिनेश घुगे स्वराज देशमुख,स्वराज वाघ,गुरू निकाळे,निलेश ताठे,सिद्धार्थ छाजेड,अजिंक्य साळी,धनंजय आंधळे, संजय दराडे,सचिन दरगुडे,कुणाल विसापूर्कर,निलेश व्यवहारे, शिवसेना महीला आघाडीच्या संगीताताई बागुल,पूजा छाजेड,नाजमा मिर्झा,सरला गोगळ,अलका कुमावत,प्रतिभा,संगीता घोडेराव,सविता दुबे नगरपालिकेचे मनोज मोटे,अनिल गवळी,मुक्तार शेख,अज्जू भाई शेख आदि उपस्थित होते.जाफर मिर्झा यांनी सूत्रसंचालन केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.