ताज्या घडामोडी

न्यायडोंगरी ला मुलाच्या मदतीने पत्नी केला व्यसनी नवऱ्याचा खून

.दारूच्या व्यसनाला कंटाळून केले कृत्य

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

न्यायडोंगरी/नांदगाव ता ६ तालुक्यातील न्यायडोंगरी येथे पत्नीने आपल्या मुलाच्या सहाय्याने पतीचा खून केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली पोलिसांनी मयताच्या मारेकरी पत्नी व मुलाला अटक केली असून मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बाळ सुधारगृहात करण्यात आली याबाबत माहिती अशी न्यायडोंगरी येथील वृंदावन नगर येथे राहणाऱ्या संजय गणेश गायकवाड (वय ३७)हा रात्रीच्या वेळी नेहमी दारू पिऊन घरात मारहाण करीत असे काल गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमाराला संजयने दारू पिऊन मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने त्याची पत्नी उषा हिने पती संजयच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून तर मुलगा अविनाश याने नायलॉन दोरीने गळफास लावून संजयचा खून केला मयत संजयची आई मीराबाई हिने आपल्या मुलाची हत्या झाल्याची फिर्याद पोलिसात दाखल केल्याने मारेकरी मायलेकाला पोलिसांनी अटक केली उप विभागीय पोलीस अधिकारी मनमाड सोहेल शेख,पोलीस निरीक्षक नांदगाव प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे हे करीत आहेत.दरम्यान मयत संजय गायकवाड यांचे वर न्यायडोंगरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.