ताज्या घडामोडी

रिक्षा संघटनांच्या सदस्यांना विमाकवच : आमदार सुहासआण्णा कांदे यांचा निर्णय

शहरातील चालक - मालक संघटनेच्या शाखांचे उद्घाटन

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव,ता १८ शहरातील शिवसेना प्रणित सर्व चालक मालक व रिक्षाचालक शहरातीलव मालवाहू रिक्षा संघटनेच्या सदस्यांच्या सुरक्षतेसाठी आमदार सुहास कांदे विमा काढून देणार आहेत या विम्यामुळे अपघात झाल्यावर औषधे व वैद्यकीय उपचारासाठी किमान पाच लाख रुपये तर दुदैवाने काही अघटित झाल्यास पंधरा लाखापर्यंत मिळणार आहेत आपल्या जीविताची काळजी घेणाऱ्या आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या विमा काढून देण्याच्या निर्णयाने शहरातील शिवसेना प्रणित सर्व चालक मालक व रिक्षाचालकव मालवाहू रिक्षा संघटनेचे सदस्य सुखावले आहेत त्यांनी एकमेकांना पेढे भरवीत आमदार सुहास कांदे यांच्या घोषणेचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले

आज नांदगाव शहरात शिवसेना व आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते शिवसेना रिक्षा युनियन,चालक मालक संघटना व माल वाहतूक संघटनेच्या शाखांचे उद्घाटन संपन्न झाले.आमदार सुहासआण्णा कांदे यांचे या प्रसंगी फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.सुरुवातील छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली तर मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला समाजसेविका सौ.अंजुमताई कांदे यांनी वॉटर फिल्टर भेट दिले .या वेळी जिल्हा प्रमुख किरण देवरे,प्रमोद भाबड,तालुका प्रमुख साईनाथ गिडगे,शहर प्रमुख सुनील जाधव,राजाभाऊ जगताप,नंदू पाटील,राजाभाऊ देशमुख,बापूसाहेब जाधव,शशिकांत सोनवणे,अय्याज शेख,दिनेश ओचाणी,संजय देवरे,हरिभाऊ नन्नवरे,सुधीर देशमुख,किशोर जाधव,नाना पेहरे,संतोष वाघ,नितीन जाधव,अमजद खान,अनिल पगारे, योगेश गायकवाड,दत्तात्रय सावंत,सतीश गांगुर्डे,अब्दुल सत्तार,सुनील आहेर,भगीरथ जेजूरकर,आदि उपस्थित होते

फोटो ओळी
नांदगाव:- शहरातील शिवसेनाप्रणित सर्व चालक मालक व रिक्षाचालकव मालवाहू रिक्षा संघटनेच्या शाखा अनावरण प्रसंगी आमदार सुहास कांदे व उपस्थितीत सर्व सदस्य

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.