महाराष्ट्र

दुष्काळाची सर्वंधिक भीषणता असूनही बाणगाव दुष्काळी मंडळाच्या यादीतून गायब…

पर्जन्यमापका च्या नोंदीच झाल्या नसल्याचे तालुक्यातील समोर तीन नव्या महसुली मंडळांची अनवस्था...

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव, ता. १० एप्रिल महिन्यात ज्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आणि ज्या गावांना दरवर्षी कायम टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो त्या बाणगाव पंचक्रोशीतली गावे दुष्काळसदृशतेच्या यादीतूनही निसटल्याने बाणगाव मंडळाच्या गावातील जनतेच्या मनात प्रशासनाच्या बद्दल तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

पर्जन्यमानाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या व पुरेशा प्रमाणात पाऊस झालेल्या गावांना सरसकट एकाच तराजूत मोजण्याच्या कार्यपद्धतीचा फटका तालुक्यातील बाणगाव,भार्डी व न्यायडोंगरी या महसूल मंडळांना बसला आहे. यावर्षी नांदगाव तालुक्यात बाणगाव बुद्रुक ला दुष्काळाची सर्वत्र भीषणता असूनही केवळ पर्जन्यमापक सुविधा नादुरुस्त असणे अथवा नसावी असे गृहीत धरूनच जाहीर करण्यात आलेल्या महसूल मंडळातून चक्क बाणगाव,भार्डी व न्यायडोंगरी मंडळे वगळण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील महसुली सज्जाची पुनर्रचना करताना चार ऐवजी आठ महसुली मंडळे अस्तित्वात आली तर सज्जाची संख्या पंचेचाळीसवर गेली.एकेका तलाठ्याचा अतिरिक्त भार कमी होऊन महसूली कामकाजात सुसुत्रता येणे अपेक्षित होते.तालुक्यात महसूल व कृषी विभागाकडील असलेली पर्जन्यमापन यंत्रणा व त्यातील नोंदीमध्ये कायम तफावत असते. २०१८ ला देखील दुष्काळाच्या काळात असाच पर्जन्यमापनाचा गोंधळ उडाला होता,त्याची पुनरावृत्ती गुरुवारी पुन्हा दिसून आली.नांदगाव मंडळात असलेले बाणगाव नव्याने मंडळ झाले आहे. वेहळगावमधून न्यायडोंगरी तर हिसवळमधून, भार्डी तयार झाले.कागदावर महसुली मंडळे आली,मात्र या मंडळांना पर्जन्यमापन यंत्रच दिले गेले नाहीत. दोन महिन्यापूर्वी बाणगाव व न्यायडोंगरीला पर्जन्यमापन यंत्रे मिळाली तर भार्डीला अद्यापही मिळालेले नाही,त्यामुळे पावसाचा डेटा संकलित झाला नाही.डेटा संकलित झाला नाही म्हणून दुष्काळसदृश यादीत देखील समावेश होऊ शकला नाही.खरे म्हणजे एप्रिल महिन्यात ज्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आणि ज्या गावांना एरवी कायम टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो त्या बाणगाव पंचक्रोशीतली गावे दुष्काळसदृशतेच्या यादीतूनही गायप झाल्याने बाणगाव बुद्रुक गावातील जनतेच्या मनात संतापाची भावना निर्माण होणे साहजिक आहे.कागदी सोपस्कार म्हणजे कर्तव्यपूर्ती मानून कारभाराचा गाडा प्रशासकीय हाकणाऱ्या संबंधिताची मोठी गोची महेंद्र बोरसे यांच्या बेमुदत उपोषणकाळात उघडी पडली होती,सरसकट दुष्काळाच्या दाहकतेत होरपळणाऱ्या तालुक्याच्या महसुली मंडळात आठही मंडळे येणे अपेक्षित असताना दुर्दैवाने ती आली नाहीत त्याचा फटका आता जनतेला नाहक सहन करावा लागत आहे.

प्रतिक्रिया…

दुष्काळाच्या प्रश्नावर आता मंडळनिहाय उपोषण करण्याची वेळ आली आहे. वगळण्यात आल्याच्या प्रकारानंतर बाणगाव भागातील जनता प्रशासनावर संतापली आहे.उपोषणे,आंदोलने केल्याशिवाय काहीच द्यायचे नाही,हे प्रशासनाच्या अंगवळणी पडले आहे.

– बापूसाहेब कवडे, ज्येष्ठ नेते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.