ताज्या घडामोडी

नांदगावी भाजपतर्फे संविधान दिन

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता.२७ शहरातील शनी चौक येथे रविवार ता २६ रोजी संविधान दिन, २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली तसेच मन की बात – कार्यक्रम साजरा करण्यात आला. या वेळी २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना तसेच मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धाजली वाहण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशातून शहरातील शनी मंदिर पटांगणात भाजपा नांदगाव शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपाच्या नेत्या अॅड. जयश्रीताई दौंड उपस्थित होत्या.यावेळी अॅड. जयश्रीताई दौंड यांनी उपस्थितांना संविधान दिनाची माहिती दिली.

यावेळी भारतीय संविधानाचे वाचन केले.सदर कार्यक्रमास भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय सानप,भाजपा तालुकाध्यक्ष गणेश शिंदे,भाजपा शहर उपाध्यक्ष दीपक पाटील,अॅड.बी.आर.चौधरी,बबनराव मोरे,भाजपा शहर सरचिटणीस सोमनाथ घोंगाणे,राजेंद्र गांगुर्डे,सतीश शिंदे,संजय पटेल,अॅड.उमेश सरोदे,दिनेश दिंडे,भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा अन्नपूर्णाताई जोशी,मीनाताई शर्मा,वर्षाताई शर्मा,मनीषाताई पाटील, बाळासाहेब बनबेरू,योगेश परदेशी,कोषाध्यक्ष धम्मवेदी बनकर,डॉ. कारभारी आहेर,अनिल बुरकुल,ज्ञानेश्वर बोरसे,नंदकिशोर शर्मा,श्याम पांडे,राहुल शर्मा,किरण मोरे,वंश पटाईत,सतीश आहिरे,शिवाजी देवरे, सनी देवरे आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी भारतीय राज्यघटनेचे पूजन केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.