ताज्या घडामोडी

सोयगाव सरपंचपदी अर्चना व्हडगळ बिनविरोध.

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृत्तसेवा

नांदगाव,ता २५ तालुक्यातील सोयगाव येथील सरपंच पदी, अर्चना समाधान व्हडगळ यांची बिनविरोध निवड झाली.माजी सरपंच परिवार सदगीर यांनी आवर्तनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने, या रिक्त सरपंच पदाच्या जागेच्या निवडीसाठी आज सोयगाव ग्रामपंचायत कार्यालय मध्ये विशेष सभा बोलावण्यात आली होती.त्यात सरपंच या पदाच्या निवडीसाठी,अर्चना व्हडगळ यांचं एकमेव अर्ज आल्याने वडगळ यांची निवडणूक अधिकारी,जे व्ही देवरे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केलेनिवड जाहीर होताच, उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाके फोडत गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.या निवडीसाठी,माजी सरपंच सौ परिघा सदगीर,उपसरपंच जगन्नाथ सदगीर बाळनाथ,निवृत्ती ठाकरे,जगन सदगीर,सौ अनुसयाबाई सदगीर,मिराबाई व्हडगळ,ताराबाई मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी देवरे यांना, ग्रामसेवक सी.एस शिरसाठ यांनी मदत केली.

फोटो ओळी
सोयगाव:- येथील सरपंच पदी अर्चना व्हडगळ बिनविरोध.निवड झाल्यानंतर त्यांच्यासमवेत सौ परिघा सदगीर सौ अनुसयाबाई सदगीर, मिराबाई व्हडगळ, ताराबाई मोरे उपसरपंच जगन्नाथ सदगीर आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.