ताज्या घडामोडी

श्रम हा संस्कार आहे:- शिवाजीराव गडाख;

मांडवड येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला प्रारंभ 

गर्जा महाराष्ट्र 24 न्युजवृत्तसेवा

नांदगाव,ता २५ विद्यार्थ्यांनी श्रम हा संस्कार म्हणून स्वीकारावा व ग्रामीण भागात केलेले श्रमदान हे श्रेष्ठदान आहे. म्हणून त्याचे महत्त्व तरुण पिढीने ओळखावे असे प्रतिपादन मविप्र संचालक शिवाजीराव गडाख यांनी केले.मांडवड येथील स्वर्गीय शरद अण्णा आहेर जनता विद्यालयात आयोजित म.वि.प्र. संचालित नांदगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरातील अध्यक्ष स्थानावरून शिवाजीराव गडाख हे बोलत होते

२३ जानेवारीपासून सुरु असलेल्या या शिबिराचे उदघाटन शालेय समितीचे अध्यक्ष प्रशांत आहेर यांच्या हस्ते झाले शिबिराच्या पहिल्या दिवशीच्या प्रबोधनपर सत्रात प्रा सुरेश नारायणे यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व या विषयावर तर जैव विविधता संवर्धन या विषयावर प्रा डॉ शरद कांबळे यांचे व्यख्यान संपन्न झाले आज दुसऱ्या दिवशीच्या सत्रात जेष्ठ पत्रकार मारुती जगधने व सर्पमित्र प्रभाकर निकुंभ यांचे अंधश्रद्धा निर्मूलन व शून्य सर्पदंश अभियान जागृती या विषयावर मार्गदर्शनपर व्यख्यान संपन्न झाले  प्रकाश आहेर,सर्जेराव थेटे,बाजीराव मोहिते,रामराव भाऊ मोहिते, दौलतराव आहेर,उमाकांत थेटे,सागर आहेर,बाळासाहेब गडाख, मुख्याध्यापिका श्रीमती संजीवनी कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.बी.पी.मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे व उपप्राचार्य डॉ.एस.ऐ.मराठे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.श्रीमती के.टी.बागुल यांनी सूत्रसंचालन केले व श्रीमती पूजा जाधव यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले.

फोटो ओळी मांडवड:-  येथील स्वर्गीय शरद अण्णा आहेर जनता विद्यालयात म. वि. प्र. संचालित नांदगाव येथील  कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाविशेष श्रमसंस्कार शिबिरात बोलतांना  शिवाजी गडाख सोबत डॉ. एस. एन. शिंदे व मान्यवर

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.