ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्यात उसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या साठी तालुकास्तरावार संत भगवानबाबा वसतिगृह सुरू

आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश तालुक्यात मुलांसाठी एक व मुलींसाठी एक अशी दोन वसतीगृह मंजूर

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृत्तसेवा

नांदगाव,ता २५ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत उसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तालुकास्तरावार संत भगवानबाबा उसतोड कामगार मुला-मुलींची शासकीय योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठीआमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव तालुक्यात मुलांसाठी एक व मुलींसाठी एक अशी दोन वसतीगृह मंजूर झालेली आहेत.या दोन वसतिगृहासाठी सर्व सोई- सुविधांयुक्त इमारत भाडे तत्वावर घेणे प्रस्तावित आहे. तरी इच्छुक इमारत मालकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त,देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.
शासकीय वसतिगृहासाठी नांदगांवला तालुक्याच्या ठिकाणी खासगी इमारती भाडे तत्वावर घ्यावयाच्या आहेत. भाडेतत्वर घेण्यात येणारी इमारत ही शैक्षणिक संस्थांच्या मध्यवर्ती ठिकाणी व मुला-मुलींच्या दृष्टीने सुरक्षित असावी. इमारतीचे क्षेत्रफळ मोकळ्या जागेसह प्रतिविद्यार्थी १०० चौ.फूट या प्रमाणे १०० विद्यार्थ्यांसाठी दहा हजार चौरसफूटापर्यंत इमारतीचे क्षेत्रफळ असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे १० विद्यार्थ्यांमागे 1 स्नानगृह व एक स्वच्छतागृह असावे.याप्रमाणे निकष पूर्ण करीत असलेल्या इमारत मालकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ, पुणे- नाशिक महामार्ग या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत, असे कळविण्यात आले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.