ताज्या घडामोडी

आमदार सुहास आण्णा कांदे यांना जिल्हास्तरीय कर्तव्यपरायण,समाजभूषण पुरस्कार प्रदान

हिसवळ खुर्द येथे भव्य कार्यक्रमात महानुभव पंथाकडून प्रदान

गर्जा महाराष्ट्र24 न्युजवृत्तसेवा

नांदगाव ता.२५ तालुक्यातील विकासकामांसह धार्मिक,अध्यात्मिक क्षेत्रात ही भरीव योगदान देत असलेल्या आमदार सुहासआण्णा कांदे यांना महानुभव पंथाकडून कर्तव्यपरायण,समाजभूषण हा जिल्हास्तरीय पुरस्कार महानुभव पंथाच्या प्रमुख महंताच्या हस्ते हिसवळ खुर्द येथे भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.सन्मान चिन्ह,व मानपत्र देऊन करण्यात आला

श्री.दत्त मंदिराचा ४५ वा वर्धापन दिन व श्रीमद्भगवतगीता कथा ज्ञानयज्ञ तथा सन्यास दिक्षा विधी सप्ताह सुरु आहे.त्या कार्यक्रमाचे सभामंडप पूजन व ध्वजारोहन आ.कांदे यांचे हस्ते संपन्न झाले.नाशिक जिल्हा महानुभाव समिती अंतर्गत महानुभव पंथाकडून राजकीय व्यक्तीला प्रथमच हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर अमरावतीचे महंत आचार्य कारंजेकर बाबाजी, अध्यक्ष स्थानी होते.संवत्सर चे राजधर बाबाजी,नाशिक चे आचार्य भागवताचार्य चिरडेबाबा,आचार्य लांडगे बाबाजी,आचार्य श्री घुगे बाबाजी, दत्तराज व्यास पालीमकर, मुकुंदराज बाबाजी,विजय बाबा पंजाबी, कृष्णराज बाबा पंजाबी,दादेराज बाबा बिडकर,अमोल दादा कोल्हेकर, नगरपालिकेचे नगरसेवक दिनकर पाटील,माजी सभापती विलासराव आहेर,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,शाईनाथ गिडगे,राजेंद्र पवार,दत्तात्रय निकम,किशोर लहाने,राजेंद्र देशमुख,अंकुश कातकडे,अमोल नावंदर,सागर हिरे उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आमदार सुहास आण्णा.कांदे यांनी सदर दत्त मंदिराला यापूर्वीच दोन सभामंडप दिले असल्याचे नमूद करून येत्या ८ ते १५ दिवसात भक्त निवास चे काम सुरु करणार असल्याचे यावेळी जाहीर केले.तर प्रस्ताविक करताना उपसरपंच संजय आहेर यांनी गावात आज एक कोटी रुपयांच्या कामांचे आज लोकार्पण करण्यात आले. तर दोन कोटी २९ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.तर सुमारे सात कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहे. तर होत असलेले कामे आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहेत.तर काही पूर्ण झाली असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाला राज्यभरातून सुमारे ३५० संत मंहत तपस्विनी उपस्थित होते.तर सदभक्त व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक येथील उत्सव समिती चे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच सदस्य उपस्थित होते

प्रतिक्रिया…
माझ्यावर जो विश्वास दाखवला व हा पुरस्कार देऊन मला सन्मानित केले त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही राजकिय क्षेत्रातील व्यक्तीला प्रथमच असा पुरस्कार महानुभाव पंथा च्या वतीने देण्यात आला हे मी माझे भाग्य समजतो या देवस्थानच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करून या देवस्थानाचा विकास करू असा शब्दही त्यांनी दिला महानुभाव पंथाच्या प्रत्येक धर्मकार्यत ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल ती करण्यासाठी मी तत्पर आहे या गावात आपल्या माध्यमातून अनेक कामे या ठिकाणी सुरू आहेत व भविष्यातही ती कमी पडू देणार नाही.नांदगाव येथे श्रीमद्भागवत कथा व पारायण सोहळा लवकरच आपण आयोजित करणार आहे व त्यासाठी राज्यभरातील प्रमुख संत महंत यांना आपण निमंत्रित करणार आहोत त्या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे

सुहास आण्णा कांदे :- ,आमदार नांदगाव विधानसभा

पुरस्कार प्रदान करताना फोटो खालील नावे
आमदार सुहास कांदे यांना पुरस्कार देताना आचार्य कारंजेकर बाबा (अमरावती),आचार्य राजधर बाबा (कोपरगाव),आचार्य चिरडे बाबाजी (नाशिक) आचार्य लांडगे बाबाची,आचार्य श्री घुगे बाबाजी,दत्तराज व्यास पालीमकर (मुकुंदराज) बाबाजी,कृष्णराज बाबा पंजाबी,दादेराज बाबा बिडकर,अमोल दादा कोल्हे,(अहमदनगर) विजय बाबा पंजाबी आदी महंत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.