ताज्या घडामोडी

नांदगाव तालुक्यातील हजारो मराठा बांधव मुंबईला रवाना

बाणगावला मराठा मोर्चाचे स्वागत : गावच्या वतीने साहित्याची मदत

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव ता.२६ तालुक्यातील हजारो सकल मराठा समाजबांधव शेकडो वाहनांच्या ताफ्यासह जेवणाची रसद घेऊन मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढाईत सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.आहेत

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नांदगांव तालुक्यातून ग्रामीण भागातून सकल मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच केली असून, बाणगाव येथे ग्रामस्थांनी मोर्चा जनजागृती रॅलीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात बैठक घेऊवून मुंबईला जाण्याच्या नियोजनाची चर्चा करण्यात आली


नांदगावला तालुकाभरातील सकल मराठा समाज बांधव एकत्र येऊन क्रांती चौकात पुष्पहार अर्पण केले याप्रसंगी भास्कर झाल्टे, विशाल वडघुले, भीमराज लोखंडे,विष्णू चव्हाण,यांचे महिलांनी औक्षण करुन पूजा करण्यात आली यानंतर शिवस्फुर्ती मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवरायांची आरती करून नंतर गावातून वाजत,गाजत मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी ‘लढगे, जितेंगे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही” छत्रपती शिवाजी महाराज की जय’,’ एक मराठा, लाख मराठा”एकच वारी, मुंबईवर स्वारी’ अशा घोषणांनी नांदगाव शहर दणाणले. मुंबई निघालेल्या मोर्चात सहभागी तरुण आणि नागरिकांना पाणी बॉक्स, तसेच वेफर्स पाकीट, भेळ भत्ता पाकीट, मिठाई, तेल, शेंगदाणे, तांदूळ, आदीसह विविध खाद्य, समान मोफत देण्यात आले.

माणिकपुंज येथील सकल मराठा समाज्याच्या वतीने मोर्ध्यात जाणाऱ्या गाडीसाठी डिझेल साठी अकरा हजार रुपयांची मदत मधुकर दरेकर यांनी दिली

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने सरसावले आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.