ताज्या घडामोडी

चांदेश्वरी घाटात मोटारसायकलचा अपघात

वाहनचालक जखमी

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

नांदगांव ता.२७ तालुक्यातील कासारी पासून बोलठाण कडे जाणाऱ्या रस्त्यावरील चांदेश्वरी घाटामध्ये शनिवार (ता.२७ ) रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान,प्लॅटिना मोटरसायकल गाडी नंबर M H 20 C L- 4638 या मोटारसायकलवर नांदगावच्या दिशेने वांगे घेवून जात असतांना गाडीवरील ताबा सुटल्यामुळे वरील नंबरची मोटरसायकल अपघात झालेला असून मोटार सायकल स्वार जखमी झाला असून त्यास नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात स्थानिकांनी उपचारासाठी नेले आहे.

मोटार सायकल वरील व्यक्ती कोण आहे याबाबत अध्यात माहिती समजलेली नसून परिसरातील कोणाला माहिती असल्यास त्यांना नातेवाईकांना सांगून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवावे असे आवाहन करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.