ताज्या घडामोडी

कचेश्वर बारसे यांना शिक्षक चळवळीतल्या योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार

गर्जा महाराष्ट्र 24 न्युजवृत्तसेवा

नांदगाव,ता २७ जिल्ह्यातील समाजवादी परिवर्तनवादी व शिक्षक चळवळीतले जेष्ठ मार्गदर्शक नेते  कचेश्वर बारसे (सर) यांना महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टी डी एफ )संघटनेमार्फत जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिर्डी येथे नाशिक धुळे अहमदनगर जळगाव नंदुरबार या जिल्ह्यातील विभागीय शिक्षक कार्यकर्ता  अभ्यास शिबिरात कचेश्वर बारसे यांनी गेल्या पाच दशकात शिक्षक चळवळीत बजाविलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यांना आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते व माजी आमदार नानासाहेब बोरस्ते,हिरालाल पगडाल,जी के थोरात,भारत घुले हनुमंतराव भोसले डॉ एन डी नांद्रे संजय पवार संदीप घोरपडे अरविंद कडलग मोहन चकोर अरुण पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत  जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

श्री.बारसे यांच्यासह धुळे येथील वि मा भामरे,अहमदनगर येथील बी.पी बोलगे,नंदुरबारच्या श्रीपतभाई पटेल,जळगाव येथील आर एच बाविस्कर यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी भाऊसाहेब कचरे पाटील,जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाअध्यक्ष टी.एम.डोंगरे
टी.डी.एफ.चे जिल्हा अध्यक्ष रविंद्र मोरे,नाशिक जिल्हा टी डी.एफ.चे कार्यवाह अरुण पवार,बाळासाहेब ढोबळे श्री.किशोर जाधव, छोटू दादा शिरसाठ,दत्तात्रय आदिक,मनोज शिरसाठ,एन.डी.एस.टी.सोसिये चे उपाध्यक्ष गंगाधर पवार,श्री.टी.डी.एफ.चे नांदगाव तालुका अध्यक्ष .आर.आर.मवाळ,रमेश घोडके,नानासाहेब धात्रक,डी.पी.थोरे.रविंद्र सोनस,सुनील कोठावदे,ऋषी डोमाडे,अतुल आढाव.व इतर अनेक मान्यवर हजर होते.

फोटो ओळी शिर्डी:- जिल्ह्यातील समाजवादी परिवर्तनवादी व शिक्षक चळवळीतले जेष्ठ मार्गदर्शक नेते  कचेश्वर बारसे (सर) यांना महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टी डी एफ )संघटनेमार्फत जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात करतांना आमदार सत्यजित तांबे भाऊसाहेब कचरे पाटील,नानासाहेब बोरस्ते हिरालाल पगडाल मोहन चकोर अरुण पवार आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.