ताज्या घडामोडी

सारताळे येथील ग्रामीण विकास संस्था संचालित शैक्षणिक संकुलात ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूजवृत्तसेवा

नांदगाव,साकोरा ता २७ तालुक्यातील सारताळे येथील ग्रामीण विकास संस्था संचालित शैक्षणिक संकुलात ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संकुलातील एकलव्य आदिवासी प्राथमिक आश्रम शाळा,कै.बाबूलाल देवचंद पगार माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा,श्री.स्वामी समर्थ कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,श्री गजानन महाराज कला,विज्ञान आणि फॅशन डीझाईन महिला महाविद्यालय व नांदगाव येथील सिद्धिविनायक शिक्षण शास्त्र महाविद्यालय यातील प्राचार्य  प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थितीत होते संस्थेचे संस्थापक रमेश तथा अप्पासाहेब पगार यांच्या हस्ते ध्वजवंदन तर कोषाध्यक्षा सौ नम्रता पगार यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

संकुलातील विविध माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य,नाटिका सामूहिक गायन आदी कलाविष्कार दाखवीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडात प्रतिसाद मिळाला प्रमुख पाहुणे म्हणून,एकलव्य आदिवासी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.नम्रता शेवाळे,प्राचार्य रवींद्र भामरे प्राचार्य विक्रम घुगे प्राचार्य रवींद्र सुरसे आदी उपस्थित होते.सांस्कृतिक विभागाचे नियोजन सि.डी.पाटील वाल्मिक दराडे शोभा आहिरे शरद गवळी श्री पाथरे यांनी केले पार पडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.पी. सूर्यवंशी यांनी केले तर समाधान चौधरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

फोटो ओळी सारताळे :-येथील ग्रामीण विकास संस्था संचालित शैक्षणिक संकुलात ७४ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करतांना संस्थेचे संस्थापक रमेश तथा अप्पासाहेब पगार यांच्या हस्ते करण्यात आले शेजारी सौ नम्रता पगार,प्राचार्य रवींद्र भामरे प्राचार्य विक्रम घुगे प्राचार्य रवींद्र सुरसे.भगवान हिरे आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.