ताज्या घडामोडी

मराठा आरक्षणाच्या लढ्याला अभूतपूर्व यश : बाणगावला गावकऱ्यांचा जोरदार जलोष

गर्जा महाराष्ट्र24 वृत्तसेवा

नांदगाव ता.२७ मराठा आरक्षणाच्या मनोज जुरांगें पाटलांच्या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्याने नांदगाव तालुक्यातील बाणगाव गावात आनंद व उत्साहाच्या वातावरणात गावकऱ्यांनी व युवकांनी फटाके फोडून ऐकमेकाना पेढे भरवत गुलालाची उधळून ऐकमेकाना शुभेच्छा दिल्या, सायंकाळी युवकांनी गावात डीजेच्या तालावर जल्लोष साजरा केला

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण मागणीसाठी मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर धडकण्यापूर्वीच २७ जानेवारीला पहाटेच्या सुमारास मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढला.सकाळी ९ वाजताच्या सुमारास नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची छोटेखानी जाहिर सभा झाली अन् इकडे नाशिक जिल्ह्यातही जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी झाली.ओबीसीच्या नोंदी आढळलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २६ जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकडे निघालेली पदयात्रा बघून राज्य सरकारनेही तातडीने पावले उचलली आणि मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला.

मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्याने राज्यभरात मराठा समाजबांधवांकडून जल्लोष,मिरवणूक,गुलालाची उधळण अन् फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत असताना.नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक येथे गावकऱ्यांनी जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी करत.मराठा आरक्षणाचे स्वागत करण्यात आले युवकांनी फटाक्यांची आतषबाजी करत.पेढे वाटून आनंद साजरा केला व सायंकाळी डिजे च्या तालावर जलोष साजरा केला.

बाणगाव बुद्रुक – मराठा आरक्षणाच्या लढ्याला अभूतपूर्व यश : बाणगाव ला जोरदार जलोष करताना युवक

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.