ताज्या घडामोडी

नांदगाव ला नमन शैक्षणिक संकुलात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गर्जा महाराष्ट्र 24 न्युजवृत्तसेवा

नांदगाव ता.२७ – येथे नमन शैक्षणिक संस्थेच्या संकुलात लिटर स्टार इंग्लिश मिडीयम स्कुल व रेंनबो इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नमन नमन शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय बागुल,उपाध्यक्षा सौ.सरिता बागुल,भारतीय सेनेमध्ये लद्दाख येथे कार्यरत असलेले जवान संदीप मोहिते शिक्षक – पालक संघाचे उपाध्यक्ष पत्रकार बाबासाहेब कदम शिक्षक – पालक कमिटीचे सदस्य,,ऑड.विद्याताई कसबे,सौ.ज्योती जंगम,मोहम्मद सय्यद,सौ. दिशा शर्मा,सौ.पूजा पाटील लिटल स्टार स्कुल च्या प्रिन्सिपल सौ,अनुराधा खांडेकर,रेंनबो इंटरनॅशनल स्कुल च्या प्रिन्सिपल सौ.स्मिता सूर्यवंशी होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केली

,स्कुल च्या विद्यार्थ्यांनी मार्च पास्टने सर्व मान्यवरांचे स्वागत केले.नमन शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय बागुल उपाध्यक्षा सौ.सरिता बागुल यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले.

कार्यक्रमाचे औचित्य रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल सौ स्मिता सूर्यवंशी यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ” गुणवंत शिक्षक’पुरस्काराने गुणगौरव संस्थेचे अध्यक्ष श्री संजय बागुल आणि उपाध्यक्ष सौ सरिता बागुल व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले


.
तसेच लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता नववीचे विद्यार्थी हेड बॉय भावेश हिरे आणि हेड गर्ल स्वामिनी सोर,डिसिप्लिन हेड इंगोले वेदांत आणि लीझा अन्सारी,क्लीनलीनेस हेड इयत्ता नववीचे विद्यार्थी प्रेम पगारे,साहिल बागुल आणि इयत्ता आठवीची विद्यार्थिनी सोनाक्षी जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कार्यक्रमामध्ये गौरविण्यात आले.

याप्रसंगी स्कुल च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले.तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते तसेच समूहनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी उरी येथे झालेल्या हल्ल्यावर आधारित असलेला डान्स प्लस ॲक्ट या सादरीकरणाने अनेकांच्या डोळ्यांमध्ये पाणी देखील आणले.देशभक्तीमध्ये स्कुल चा परिसर रंगून गेला होता


.शिक्षक पालक संघाच्या सदस्या अड.विद्याताई कसबे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या कलागुणाचे कौतुक केले यावेळी स्कुल चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे व आभार शिक्षिका सूत्रसंचालन अनिता जगधने,दिपाली भांगे यांनी केली कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री संजय बागुल उपाध्यक्षा सौ सरीता बागुल यांनी विद्यार्थ्यांना मिठाई वाटप केली.कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरिता पार पाडला.

फोटो ओळ -/
नांदगाव – येथील नमन शैक्षणिक संस्थेच्या लिटल स्टार व रेंनबो इंटरनॅशनल स्कुल मध्ये प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन करून सलामी देताना संस्थेचे अध्यक्ष संजय बागुल उपाध्यक्षा सरिता बागुल पालक संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब कदम,पालक संघाचे सदस्य जवान संदीप मोहिते,ऑड.विद्याताई कसबे,ज्योती जंगम,मोहम्मद सय्यद,दिशा शर्मा,पूजा पाटील लिटल स्टार स्कुल च्या प्रिन्सिपल,अनुराधा खांडेकर,रेंनबो इंटरनॅशनल स्कुल च्या प्रिन्सिपल स्मिता सूर्यवंशी आदी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.