ताज्या घडामोडी

मराठा आरक्षणचा अभूतपूर्व निर्णय : आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या निवासस्थानी आनंदोत्सव साजरा

नांदगाव तालुक्यात सकल मराठा समाजातर्फे जल्लोष

गर्जा महाराष्ट्र न्युज वृत्तसेवा

नांदगाव २८ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्याबद्दल शनिवारी (ता. २७) आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या निवासस्थानी मराठा बांधवांनी जल्लोष केला.

आमदार सुहासआण्णा कांदे यांनी मराठा समाजाच्या भावना व न्यायिक मागण्या मुख्यमंत्र्यापर्यंत मांडणार असून या मागणीसाठी आपल्या आमदारकीच्या पदाचा राजीनामा देऊ अशी घोषणा करीत तालुक्यात झालेल्या आरक्षण मागणीच्या आंदोलनातल्या सहभाग प्रसंगी घोषणा केली होती. मुंबईत आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अध्यादेश सुपूर्द केल्याचे वृत्त येताच नांदगाव शहर व तालुक्यात एकच जल्लोष करण्यात आला. तर राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांनी आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या हनुमाननगर येथील निवासस्थानी येत आपला आनंदोत्सव साजरा केला.

आमदार सुहासआण्णा कांदे यांनी या आनंदोत्सवास सहभागी होत प्रातिनिधिक स्वरूपात माजी आमदार संजय पवार,माजी सभापती विलासराव आहेर, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे मनमाड बाजार समितीचे संचालक विठ्ठल आहेर माजी नगरसेवक नंदू पाटील,नांदगाव बाजार समितीचे माजी संचालक भरत शेलार,अनंत आहेर,अशोक निकम, बाबासाहेब आहेर,शरद काजळे, बंडू थेटे आदी उपस्थितांना पेढे भरवून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला माजी आमदार संजय पवार यांनीही आमदार सुहासआण्णा कांदे यांचा शाल देऊन सत्कार केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.