ताज्या घडामोडी

कन्हुशेठ नहार यांचे चिरंतन स्मृती जपण्यासाठी स्मारक व्हावे:- संजीव धामणे

बोलठाण एज्युकेशनचा प्रेरणोत्सव व जागर कर्तृत्वाचा

गर्जा महाराष्ट्र24 न्युज वृत्तसेवा

नांदगाव,ता २८ जिल्ह्याच्या टोकाला मराठवाड्याच्या हद्दीवर राहूनही जिल्हास्तरीय लोकाभिमुख नेतृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या दिवंगत कन्हैयालाल नहार उर्फ कन्हुशेठ नहार (बाबा) यांच्या चिरंतन स्मृतीचा ठेवा जपण्यासाठी विद्यालयाच्या आवारात यथोचित स्मारक म्हणून पुतळा उभारण्यात यावा. आनंदी आत्मविश्वासू सदाचारी पराक्रमी अखंड जिज्ञासू मिताहारी शतायुषी हा श्लोक विद्यार्थ्यांना जीवनात प्रगती करायची असल्यास उपयुक्त ठरणार असे प्रतिपादन नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणीक संकुलाचे अध्यक्ष संचालक संजीव धामणे यांनी केले
तालुक्यातील बोलठाण एज्युकेशन मंडळाच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या आवारात जुन्या पिढीतील माजी आमदार दिवंगत कन्हैयालाल उर्फ कन्हुशेठ नहार यांच्या ९९ व्या जंयतीचे औचित्य साधून आयोजित प्रेरणोत्सव व जागर कर्तृत्वाचा या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून संजीव धामणे बोलत होते अध्यक्षस्थानी माजी सभापती राजेंद्र नहार होते व्यासपीठावर शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी नंदा ठोके,जेष्ठ पत्रकार संजीव निकम संस्थेचे सचिव गोकुलशेठ उर्फ सुरेंद्र नाहाटा मोहनलाल सोनी नहार पतसंस्थेचे अध्यक्ष अमित नहार प्राचार्य विजय शेलार पर्यवेक्षक संतोष बोरसे आदी उपस्थितीत होते श्री संजीव धामणे यांनी दिवंगत कन्हुशेठ नहार यांच्या कार्याचा आढावा घेतांना पुलोद शासनाच्या प्रयोगात नहार यांच्या सहभागाचा उल्लेख करताना जिल्ह्याच्या टोकाला दीडशे किमी अंतरावर राहून त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून उभे केलेल्या शैक्षणिक कामाबद्दल गौरव केला एवढ्या मोठ्या नेत्याचे पुस्तक निघावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या निमित्ताने क्रीडा सांस्कृतिक स्पर्धातून विशेष कामगिरी करीय विजेत्या ठरलेल्या विद्यार्थी खेळाडू कलाकार यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला

फोटो ओळी
बोलठाण:- दिवंगत लोकनेते माजी आमदार कन्हैयालाल उर्फ कन्हुशेठ नहार यांच्या ९९ व्या जंयती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना संजीव धामणे सोबत श्रीमती नंदा ठोके,राजेंद्र नहार संजीव निकम गोकुलशेठ उर्फ सुरेंद्र नाहाटा मोहनलाल सोनी अमित नहार प्राचार्य विजय शेलार संतोष बोरसे शेजारी उपस्थितीत विद्यार्थी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.